US Immigrant Visa: इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 01:40 PM2021-10-30T13:40:26+5:302021-10-30T13:44:18+5:30

दूतावासातून मिळालेल्या सर्व सूचना पाळल्यास नाहक होणारा उशीर टाळता येऊ शकतो.

US Visa How can I avoid causing unnecessary delays in my america immigrant visa case? | US Immigrant Visa: इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल?

US Immigrant Visa: इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल?

googlenewsNext

उत्तर: इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधीकधी वेळखाऊ आणि तापदायक ठरू शकते. दूतावासातून मिळालेल्या सर्व सूचना पाळल्यास नाहक होणारा उशीर टाळता येऊ शकतो. ही बाबा अतिशय सामान्य वाटू शकते. पण बऱ्याचदा होणारा विलंब हा सांगण्यात आलेली कागदपत्रं जमा न करल्यानं होतो.

इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेसाठी अर्जदाराला अनेक कागदपत्रं जमा करावी लागतात. त्यामध्ये (१) सहाय्यक कर परताव्यासाह शपथपत्र, (२) वैद्यकीय परीक्षा, (३) पोलीस प्रमाणपत्रासह नागरी कागदपत्रांचा समावेश होतो. भारतासाठी आवश्यक असलेल्या नागरी कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी कृपया https://travel.state.gov/content/travel/en/us-visas/Visa-Reciprocity-and-Civil-Documents-by-Country/India.html या संकेतस्थळाला भेट द्या. 

व्हिसा मुलाखतीच्या आधी सर्व कागदपत्रं गोळा करा. काही अर्जदारांना मुलाखतीच्या आधी कागदपत्रं अपलोड करण्यास सांगण्यात येतं. जर तुम्ही नागरी कागदपत्रं भरण्यास विसरलात, तर प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. मुलाखतीवेळी सर्व मूळ कागदपत्रं आठवणीनं घेऊन जा.

जर तुमच्याकडे अतिरिक्त कागदपत्रं मागितली गेली, तर ती शक्य तितक्या लवकर जमा करा. तुमच्या फाईलमधील काही गोष्टी विशिष्ट कालावधीसाठीच वैध असतात. उदाहरणार्थ, तुम्हाला मिळालेलं पोलीस प्रमाणपत्र व्हिसासाठी केवळ वर्षभरच वैध असतं. कोविड-१९ महामारीमुळे स्टेट डिपार्टमेंटनं त्याची वैधता दोन वर्षे केली आहे. पण कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय यामध्ये बदल होऊ शकतो. तुमची वैद्यकीय परीक्षा फक्त ६ महिन्यांसाठी वैध असते. त्या परीक्षेच्या निकालावरून त्याची वैधता कमी होऊ शकते.

तुमची केस अतिरिक्त कागदपत्रांसाठी प्रलंबित असल्यास, आवश्यक कागदपत्रं लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करा. इतर कागदपत्रं मिळण्यास तुम्हाला विलंब होत असल्यास आणि तुम्ही ती पोलीस प्रमाणपत्र आणि वैद्यकीय परिक्षेची वैधता संपल्यावर जमा केल्यास, तर तुम्हाला कागदपत्रं जमा करण्यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांना पुन्हा विनंती करावी लागते. तुम्ही सर्व कागदपत्रं जमा करण्यापूर्वी आधी जमा केलेल्या कागदपत्रांची वैधता संपल्यास, तुमच्या केसचा निपटारा होण्यासाठी वेळ लागू शकतो. यामुळे सगळ्यांचंच काम वाढतं, नवी कागदपत्रं काढण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होतो.

इमिग्रंट व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यात विलंब होऊ नये यासाठी सर्व सूचना नीट वाचा, कागदपत्रं गोळा करण्यास आधीपासूनच सुरुवात करा आणि जेव्हा कागदपत्रांची मागणी करण्यात येईल, तेव्हा ती लवकरात लवकर जमा करा.

इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास कृपया www.travel.state.gov या संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व सूचना उपलब्ध आहेत. एनव्हीसीपासून मुलाखतीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कशी होते, त्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया www.ustraveldocs.com/in वर जा किंवा  (91-120) 484-4644, (91-22) 6201-1000 किंवा अमेरिकेतून 1-703-520-2239 या क्रमांकावर संपर्क साधा.

महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

Web Title: US Visa How can I avoid causing unnecessary delays in my america immigrant visa case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.