अमेरिकेच्या नौदलाचे विमान समुद्रात कोसळले, 8 जणांना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 05:58 PM2017-11-22T17:58:54+5:302017-11-22T18:04:01+5:30

अमेरिकन नौदलाचे विमान फिलिपाईन्स समुद्रात कोसळले आहे. या विमानातील 8 जणांना वाचविण्यात यश आल्याचे अमेरिकन नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे.

US Navy aircraft collapses in the sea, save 8 people | अमेरिकेच्या नौदलाचे विमान समुद्रात कोसळले, 8 जणांना वाचवले

अमेरिकेच्या नौदलाचे विमान समुद्रात कोसळले, 8 जणांना वाचवले

Next
ठळक मुद्देनौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सुरु केलेल्या शोधमोहिमेत 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या सर्व लोकांना यूएसएस रोनल्ड रेगन (सीव्हीएन 76) या नौकेवर पाठलिण्यात आले आहे.

मनिला- अमेरिकन नौदलाचे विमान फिलिपाईन्स समुद्रात कोसळले आहे. या विमानातील 8 जणांना वाचविण्यात यश आल्याचे अमेरिकन नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. सी2-ए ग्रेहाऊंड हे विमान कर्मचारी आणि प्रवासी अशा 11 लोकांसह जपानजवळ ओकिनावाच्या आग्नेयेस स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणे तीन वाजता कोसळले.

नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सुरु केलेल्या शोधमोहिमेत 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या सर्व लोकांना यूएसएस रोनल्ड रेगन (सीव्हीएन 76) या नौकेवर पाठलिण्यात आले असे असून त्यांच्या वैद्यकीय चाचणीनंतर ते चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. उर्वरित 3 जणांचा शोध सुरु आहे. अमेरिकन नौदल आणि जपान मेरिटाईम सेल्फडिफेन्स फोर्सच्या जहाजांच्या व विमानांच्या मदतीने हे काम चालू आहे. ही घटना ओकिनावाच्या आग्नेयेस 500 नाविक मैल अंतरावर घडली आहे.



हे विमान इवाकुनी येथील मरिन कॉर्प्स एअर स्टेशनपासून यूएसएस रोनल्ड रेगन नौका यांच्यामध्ये प्रवासी आणि मालाची नेहमीप्रमाणे वाहतूक करत होते. विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे जपानचे संरक्षणमंत्री इत्सुनोरी ओनोडेरा यांनी सांगितले आहे. या अपघाताचे कारण शोधले जाईल असे अमेरिकन नौदलाने स्पष्ट केले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिकेचे जहाज यूएसएस फिट्झगेराल्ड आणि फिलिपाईन्सचे मालवाहू जहाज यांचा जपानजवळच्या समुद्रात अपघात झाला होता. त्यामध्ये सात अमेरिकन खलाशांचा मृत्यू झाला होता.
 

Web Title: US Navy aircraft collapses in the sea, save 8 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :USअमेरिका