अमेरिकेत ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीकला बहुमतासाठी 14 जागांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 09:45 AM2018-11-07T09:45:12+5:302018-11-07T11:55:07+5:30

डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा मुसंडी मारल्याचे चित्र असून हा ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. 

Trump's Victory in America; Republicans retain control of US Senate | अमेरिकेत ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीकला बहुमतासाठी 14 जागांची गरज

अमेरिकेत ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीकला बहुमतासाठी 14 जागांची गरज

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व अबाधित राखले आहे. तर अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा मुसंडी मारली असून बहुमतासाठी त्यांना केवळ 14 जागांची गरज आहे. हा ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. 




अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सदनातील (सीनेट) 100 पैकी 35 जागा आणि कनिष्ठ सदनामध्ये (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) 435 जागांवर खासदार निवडले जाणार आहेत. या साठी मंगळवारी मतदान झाले. आज निकाल घोषित होणार आहे. 




टेक्सासमध्ये टेड क्रूज पुन्हा विजयी झाले आहेत. सीनेटमध्ये ट्रम्प याच्या रिपब्लिकन पक्षाचेच वर्चस्व दिसून येत आहे. मात्र, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने मुसंडी मारल्याने वर्चस्वावरून घासाघीस होणार आहे. सीनेटमध्ये 100 पैकी 94 जागांवर निकाल जाहीर झाले असून 51 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर 42 जागांवर डेमॉक्रेटीक पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. 


हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये 435 जागांपैकी 391 जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. ट्रम्प यांच्या पक्षाला 187 जागा तर डेमॉक्रेटीक पक्षाला 204 जागा मिळाल्या आहेत. अद्याप 44 जागांचा निकाल येणे बाकी असून डेमॉक्रेटीक पक्षाला बहुमतासाठी केवळ 14 जागांची गरज आहे. 
दोन्ही सदनांमध्ये गेल्या 84 वर्षांत केवळ तीनवेळा एकाच पक्षाला वर्चस्व राखने शक्य झाले आहे.

Web Title: Trump's Victory in America; Republicans retain control of US Senate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.