'काळा पैसा'वाल्यांवर पडणार कुऱ्हाड! स्विसमधल्या खातेधारकांची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 09:14 AM2019-02-05T09:14:25+5:302019-02-05T09:15:40+5:30

स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे.

switzerland transfer details of indian account holders in hsbc | 'काळा पैसा'वाल्यांवर पडणार कुऱ्हाड! स्विसमधल्या खातेधारकांची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू

'काळा पैसा'वाल्यांवर पडणार कुऱ्हाड! स्विसमधल्या खातेधारकांची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू

Next

नवी दिल्ली- स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. स्विस अधिकाऱ्यांनी एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीय लोकांना यासंबंधी एक लिखित स्वरूपात नोटीसही पाठवली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऑगस्ट 2008मध्येच स्वित्झर्लंडच्या फेडरल कोर्टाच्या निर्णयानंतर स्विसमधल्या खातेधारकांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जवळपास दीड महिन्यांपूर्वी स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेधारकांना फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. भारताकडून मागणी करण्यात आलेल्या काळा पैशाची माहिती ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारांतर्गत येते. नोटीसमध्ये एप्रिल 2011पासून खातेधारकांना माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं.

फेडरल बँकेच्या आदेशानंतर भारतीय खातेधारकांना एक सहमती पत्रही भरण्यासाठी सांगण्यात आले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेल्या सूचना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचंही या पत्रात लिहिलं आहे. वर्षं  2011मध्ये फ्रान्सकडून भारताला स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेतील खातेधारकांच्या 628 भारतीयांची नावं मिळाली आहेत. त्यानंतर 2015मध्ये केलेल्या खुलाशामध्ये 1195 भारतीयांची नावं समोर आली होती. 2006-07मध्ये स्विस बँक खात्यांमध्ये भारतीय खातेधारकांचे जवळपास 25420 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 85 लोक भारतीय नागरिक आहेत. तसेच त्यांचे एक मिलियन डॉलर पैसे या खात्यांमध्ये जमा आहेत. तत्पूर्वी फ्रान्सनं एचएसबीसीमध्ये जवळपास 700 भारतीयांच्या खातेधारकांची माहिती ऑगस्ट 2011ला दिली होती. त्यानंतर जगभरातल्या इतर देशातील सरकारांनीही कारवाई केली होती.  

Web Title: switzerland transfer details of indian account holders in hsbc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.