श्रीलंकेतील राजकीय पक्ष राष्ट्रपतींविरुद्ध सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 06:35 AM2018-11-13T06:35:22+5:302018-11-13T06:35:58+5:30

‘संसद बरखास्तीचा निर्णय अवैध ठरवा’

Sri Lankan political parties in the Supreme Court against the President | श्रीलंकेतील राजकीय पक्ष राष्ट्रपतींविरुद्ध सुप्रीम कोर्टात

श्रीलंकेतील राजकीय पक्ष राष्ट्रपतींविरुद्ध सुप्रीम कोर्टात

Next

कोलंबो : श्रीलंकेतील मुख्य राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या एका सदस्याने राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संसद बरखास्त करण्याच्या सिरिसेना यांच्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सिरिसेना यांनी संसदेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या २० महिने अगोदर संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता आणि ५ जानेवारीला मध्यावधी घेण्याची घोषणा केली होती. राजपक्षे यांच्याकडे पंतप्रधानपदी राहण्यासाठी आवश्यक सदस्य संख्या नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी संसद बरखास्त केली. महिंद्र राजपक्षे यांनीही सिरिसेना यांची संगत सोडून नव्या पक्षाचा निर्णय घेतला.
 

Web Title: Sri Lankan political parties in the Supreme Court against the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.