संयुक्त राष्ट्राच्या पोस्ट एजन्सीकडून दिवाळी विशेष पोस्टेज स्टॅम्प, भारतानं मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 08:17 PM2018-11-07T20:17:34+5:302018-11-07T20:17:57+5:30

दिवाळीच्या मुहूर्तावर संयुक्त राष्ट्रानं विशेष पोस्ट तिकीट जारी केल्यानं भारतानं त्यांचे आभार मानले आहेत.

special-diwali-postage-stamp-released-by-united-nations-postal-agency | संयुक्त राष्ट्राच्या पोस्ट एजन्सीकडून दिवाळी विशेष पोस्टेज स्टॅम्प, भारतानं मानले आभार

संयुक्त राष्ट्राच्या पोस्ट एजन्सीकडून दिवाळी विशेष पोस्टेज स्टॅम्प, भारतानं मानले आभार

Next

वॉशिंग्टन- दिवाळीच्या मुहूर्तावर संयुक्त राष्ट्रानं विशेष पोस्ट तिकीट जारी केल्यानं भारतानं त्यांचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या पोस्ट विभागानं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 19 ऑक्टोबर रोजी एक विशेष कार्यक्रम पत्र जारी केलं आहे. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी असलेल्या सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट केलं आहे.

चांगल्या आणि वाईटामधला संघर्ष दररोज सुरू असतो. प्रकाशाच्या पवित्र दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं पहिल्यांदाच वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याच्या आमच्या प्रयत्नाला यूएननं स्टॅम्पच्या माध्यमातून दुजोरा दिला आहे, त्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्राचे आभारी आहोत. 1.15 डॉलर मूल्याच्या या स्टॅम्पच्या 10 तिकिटांची एक शीट जारी केली आहे. या स्टॅम्पवर संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची झगमगती इमारतीचं चित्र आहे आणि सणानिमित्त हॅपी दिवाळीचाही संदेश दिला आहे.

Web Title: special-diwali-postage-stamp-released-by-united-nations-postal-agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.