आॅक्सिजन कमी होण्याचा धोका?

By admin | Published: December 3, 2015 03:14 AM2015-12-03T03:14:00+5:302015-12-03T03:14:00+5:30

वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे

The risk of decreasing oxygen? | आॅक्सिजन कमी होण्याचा धोका?

आॅक्सिजन कमी होण्याचा धोका?

Next

लंडन : वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधत वेळीच उपाययोजना करण्यास सुचविले आहे.
समुद्राचे तापमान काही अंशांनी वाढल्यास पृथ्वीवरील आॅक्सिजनचे (प्राणवायू) प्रमाण कमी होऊ शकते. परिणामी मोठ्या संख्येने प्राणी आणि लोकांच्या मृत्यूने सृष्टीचे रूपांतर मरुभूमीत होऊ शकते, असा इशारा या संशोधकांनी दिली आहे. पृथ्वीवरील वाढते तापमान अधिक वाढणार नाही, यासाठी काय काय उपाय करणे जरूरी आहेत, यावर पॅरिस येथे जगभरातील नेते, पर्यावरणतज्ज्ञ विचारमंथनासाठी एकवटले असताना ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी आॅफ लिसेस्टरमधील संशोधकांनी हा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढत समस्त मानवजातीचे डोळे उघडले आहेत. समुद्राचे तापमान २१०० पर्यंत जवळपास ६ अंश सेल्सियसवर गेल्यास आॅक्सिजनचे उत्सर्जनच संपुष्टात येईल. आॅक्सिजनच अवघ्या सृष्टीचा प्राण आहे. प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास एकूणच जीवसृष्टीचा नाश ओढवेल. (वृत्तसंस्था)

पृथ्वीचे वाढते तापमान हा मुद्दा राजकीय आणि विज्ञानजगताच्या ऐरणीवर येऊन तब्बल दोन दशके झाली आहेत. पृथ्वीचे तापमान सारखे वाढत राहिल्यास सृष्टीवर कोणती संकटे कोसळतील, याबाबत या संशोधकांनी सविस्तर ऊहापोह केला आहे.

पृथ्वीवर भविष्यात ओढवणाऱ्या संकटापैकी सर्वाधिक भयानक संकट असेल ते पुराचे थैमान. अंटार्टिकामधील बर्फ वितळून येणाऱ्या पुराने जगभरात हाहाकार उडेल. परिणामी जीवसृष्टीचा नाश होऊ शकतो, असे या विद्यापीठातील गणित विभागाचे प्रो. सर्गेई पेट्रोव्हस्की यांनी सांगितले.

Web Title: The risk of decreasing oxygen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.