अमेरिकेत शिकायला जायचेय? 'स्टुडंट स्टेटस' पाळायलाच हवा! कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 02:38 PM2018-08-11T14:38:57+5:302018-08-11T14:43:02+5:30

नव्या नियमांनुसार 3 ते 10 वर्षांपर्यंत अमेरिका बंदी

policy for international students strict in america might lead to ban for ten years | अमेरिकेत शिकायला जायचेय? 'स्टुडंट स्टेटस' पाळायलाच हवा! कारण...

अमेरिकेत शिकायला जायचेय? 'स्टुडंट स्टेटस' पाळायलाच हवा! कारण...

googlenewsNext

मुंबई : अमेरिकेमध्ये शिकायला आलेल्या जवळपास 1.86 लाख परदेशी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. परदेशी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत 9 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या नुसार 'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच विद्यार्थी आणि त्याच्या सोबत गेलेल्या व्यक्तीस बेकायदेशीर मानण्यात येणार आहे. याच बरोबर आणखीही काही बंधने लादण्यात आली आहेत. 
 

अमेरिकेमध्ये परदेशातून दरवर्षी लाखो विद्यार्थीशिक्षणासाठी येत असतात. याआधी इमिग्रेशन न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला बेकायदेशीर ठरविण्य़ात येत होते. नव्या नियमांनुसार या विद्यार्थ्याने 'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केल्यास त्याला बेकायदेशीर ठरविण्यात येणार आहे. बेकायदेशीरच्या व्याख्येमध्ये आता केवळ व्हिसाची मुदत संपून गेल्यानंतर राहणारे एवढेच नसून अन्य कारणेही आता अंतर्भूत करण्यात आली आहेत. जसे की एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणसंस्थेने अभ्यासक्रमासाठी आठवड्याची मुदत दिली असेल आणि तो त्या वेळेत पूर्ण करु शकला नसेल तर तो बेकायदेशीर ठरणार आहे. तसेच बेकायदा नोकरी किंवा मुदतबाह्य राहिल्यासही हा नियम लागू होणार आहे. 

याचबरोबर 'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केल्यानंतर 180 दिवसांनंतर या विद्यार्थ्याने अमेरिका सोडल्यास त्याचे परतीचे मार्ग खुंटणार आहेत. म्हणजेच यानंतर पुढील 3 ते 10 वर्षे त्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी असणार आहे. 
 
माफीनामा दिल्यास काय होईल?
'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केलेल्या विद्यार्थ्याने पाच महिन्यांच्या आत माफी मागितल्यास त्याच्यावरील बंदीच्या दिवसांची मुदत तात्पुरती थांबविण्यात येईल. त्याच्या अर्जावर विचार करून गुन्ह्यानुसार अर्ज फेटाळल्यास पुन्हा बंदीचा कालावधी सुरु होणार आहे. 

Web Title: policy for international students strict in america might lead to ban for ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.