असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:05 PM2018-11-27T19:05:55+5:302018-11-27T19:06:18+5:30

हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या विमानांची सुखरूप वाहतूक करताना वैमानिकांची कसोटी लागते. पण विमान हजारो फूट उंचावर असताना वैमानिकाचा डोळा लागला तर...

Pilot sleeping in flying airplane | असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि...

असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि...

Next

मेलबर्न - हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या विमानांची सुखरूप वाहतूक करताना वैमानिकांची कसोटी लागते. पण विमान हजारो फूट उंचावर असताना वैमानिकाचा डोळा लागला तर... तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी. मात्र असाच धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियात घडला आहे. एक छोटे विमान उडवत असलेल्या वैमानिकाला प्रवासादरम्यान पेंग आली. त्यामुळे विमान भरकटले आणि उतरण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणाहून सुमारे 46 किमी दूर पोहोचले. 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या विमानामध्ये केवळ पायलटच होता. हा प्रकार  8 नोव्हेंबर रोजी घडला होता. मात्र आता त्याची माहिती समोर आली आहे. पायपर पीए-31 नावाचे हे विमान टस्मानिया येथून डेव्हनपोर्टच्या दिशेने निघाले होते. त्या प्रवासादरम्यान, वैमानिकाचा अचानक डोळा लागला. त्यामुळे हे विमान भरकटून 46 किमी पुढे गेले. मात्र सुदैवाने वैमानिकाला जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. 
दरम्यान, या घटनेचा तपास ऑस्ट्रेलियाई परिवहन सुरक्षा ब्युरोकडून करण्यात येत आहे. मात्र या वैमानिकाला विमान सुखरूपपणे उतरवण्यापूर्वी नेमकी कशी जाग आली, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही.  

Web Title: Pilot sleeping in flying airplane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.