पाकिस्तानात सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; निषेधार्थ रस्त्यावर उतरली जनता, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:30 IST2018-01-11T14:14:58+5:302018-01-11T15:30:37+5:30
सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या निशेधार्थ लोकांमध्ये आक्रोश वाढला. आणि लोक रस्त्यावर उतरलेत.

पाकिस्तानात सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; निषेधार्थ रस्त्यावर उतरली जनता, दोघांचा मृत्यू
कराची : पाकिस्तानमध्ये सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याघटनेचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही घटना घडली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. पाकिस्तानी वृत्तपत्र ' द डॉन' च्या वृत्तानुसार पंजाब प्रांतातील कासुर जिल्ह्यात काल पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. त्यांनंतर या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या विरुद्ध इथली जनता रस्त्यावर उतरली आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कासुर जिल्ह्यातील राहत्या घरासमोरून चिमुरडीचं अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी तिचे शव कचऱ्याच्या ढिगात आढळले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचं शव ताब्यात घेतलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविलं. शवविच्छेदनात बलात्कारानंतर गळा दाबून या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.
पीडित मुलीचे आई-वडील तिर्थयात्रेसाठी गेले असताना ही घटना घडली. आई-वडील घरी नसल्याने चिमुरडी आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.