अमेरिकेने पैसे बंद केल्याचे पाकिस्तानने भारतावर फोडले खापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 01:02 PM2018-01-05T13:02:45+5:302018-01-05T14:10:45+5:30

अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत बंद केल्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. पाकिस्तानने आता या शाब्दिक लढाईत भारताला खेचले आहे.

Pakistan has blamed the United States for its closure of money | अमेरिकेने पैसे बंद केल्याचे पाकिस्तानने भारतावर फोडले खापर

अमेरिकेने पैसे बंद केल्याचे पाकिस्तानने भारतावर फोडले खापर

googlenewsNext
ठळक मुद्देभारत आणि अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले असून अमेरिका भारताचीच भाषा बोलत आहे असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी केला आहे.

इस्लामाबाद - अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत बंद केल्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. पाकिस्तानने आता या शाब्दिक लढाईत भारताला खेचले आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खोटी आणि कपटनितीची खेळी केली आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही तेच आरोप करत आहेत असे एक्सप्रेस ट्रिब्युन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने म्हटले आहे. 

भारत आणि अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले असून अमेरिका भारताचीच भाषा बोलत आहे असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी केला आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले होते.

गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं.  पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की,' शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते'.

Web Title: Pakistan has blamed the United States for its closure of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.