इराणमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, 170 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:43 AM2018-11-26T09:43:50+5:302018-11-26T11:46:59+5:30

इराकला लागून असलेल्या पश्चिम दिशेच्या सीमेवर इराणमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. यामध्ये जवळपास 170 जण जखमी झाले आहेत.

over 170 hurt after magnitude 6 3 earthquake rattles western iran | इराणमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, 170 जण जखमी

इराणमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, 170 जण जखमी

ठळक मुद्देइराकला लागून असलेल्या पश्चिम दिशेच्या सीमेवर इराणमध्ये रविवारी रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसलेअमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार 6.3 रिश्टर स्केलचा हा धक्का बसला.केरमनशाह प्रांतातील सरपोल-ए-जहाब परिसरात हा भूकंप झाला.

तेहरान -  इराकला लागून असलेल्या पश्चिम दिशेच्या सीमेवर इराणमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. यामध्ये जवळपास 170 जण जखमी झाले आहेत. इराणचे आप्तकालीन यंत्रणेचे प्रमुख पीर हुसेन कोलीवंद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार 6.3 रिश्टर स्केलचा हा धक्का बसला. केरमनशाह प्रांतातील सरपोल-ए-जहाब परिसरात हा भूकंप झाला. जमिनीपासून याचा केंद्रबिंदू  10 किमी आतमध्ये होता. इराकची राजधानी बगदादपर्यंत हा भूकंपाचा धक्का जाणवला. तसेच  फार्स या वृत्तसंस्थेने इराणमधील सात प्रांतांमध्ये याचा परिणाम दिसत असल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये याच परिसरात भूकंपामुळे सुमारे 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.



 

Web Title: over 170 hurt after magnitude 6 3 earthquake rattles western iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.