पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 06:15 AM2018-06-06T06:15:38+5:302018-06-06T06:15:38+5:30

नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी  साफ केली.

netherlands pm mark rutte cleans coffee drop from floor | पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...

पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...

Next

नेदरलँड :  नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी  साफ केली. त्यांच्या या कामाचे सोशल मीडियात कौतुक करण्यात येत आहे. 
मार्क रूट यांचा सफाई करतानाचा हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मार्क रूट संसदेतील कामकाज आटपून बाहेर जाताना कॉफी पीत जात होते. यावेळी त्यांच्या हातून कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. सांडलेली कॉपी साफ करण्यासाठी येथील महिला कर्मचारी पुढे सरसावली. मात्र, मार्क रूट यांनी कॉफीचा कप उचलला आणि त्या महिलेकडून लादी पुसण्याचे साहित्य घेऊन स्वत: साफसफाई केली. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी त्यांच्या कामाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.   
दरम्यान, सोशल मीडियात सुद्धा त्यांच्या या कामाची प्रशंसा करण्यात येत आहे. पाकिस्तानचे पत्रकार हामिद मीर यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कधीतरी पंतप्रधान सफाई कर्मचा-याचे काम करु शकतात. मात्र आपल्याकडे असे होत नाही. फक्त नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्ट रूट हेच सफाई कर्मचारी म्हणून काम करु शकतात. म्हणूनच डच लोकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. मी त्यांच्या नम्रपणाचा साक्षीदार आहे.  



गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्क रूट नेदरलँडच्या राजाला भेटायला जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये ते चक्क सायकलवरून प्रवास करताना दिसले. व्यवस्थित सुटबूट परिधान केलेले मार्क रूट राजवाड्याजवळ आल्यानंतर त्यांनी आपली सायकल पार्क केली होती. त्यावेळी मार्क रूट नेदरलँडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार होते. त्यानिमित्ताने त्यांनी राजाची भेट घेतली होती. याशिवाय गेल्यावर्षी जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड दौऱ्यावर होते. तेव्हा मार्क रूट यांनी नरेंद्र मोदींना सायकल भेट दिली होती. 

Web Title: netherlands pm mark rutte cleans coffee drop from floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.