खळबळजनक! "20 लोकांसमोर टॉपलेस व्हायला सांगितलं आणि आमचे फोटो, व्हिडीओ काढले"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:08 AM2023-08-09T11:08:47+5:302023-08-09T11:09:16+5:30

मिस युनिव्हर्स इंडोनेशियामध्ये सहभागी झालेल्या 6 मॉडेल्सनी लैंगिक छळाबाबत पोलिसात तक्रार केली आहे.

miss universe indonesia contestants ordered topless photo videos body checks polie complaint | खळबळजनक! "20 लोकांसमोर टॉपलेस व्हायला सांगितलं आणि आमचे फोटो, व्हिडीओ काढले"

खळबळजनक! "20 लोकांसमोर टॉपलेस व्हायला सांगितलं आणि आमचे फोटो, व्हिडीओ काढले"

googlenewsNext

मॉडेलच्या आयुष्याचाही संघर्ष असतो. त्यांनाही अनेक अडथळे पार करावे लागतात. नेहमीच स्वतःला सिद्ध करावं लागेल. पण सत्य कोणापासून लपलेलं नाही. जगभरातील या सौंदर्यवतींना त्रास देखील सहन करावा लागला आहे. काही वेळा त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेतून समोर आली आहे. मिस युनिव्हर्स इंडोनेशियामध्ये सहभागी झालेल्या 6 मॉडेल्सनी लैंगिक छळाबाबत पोलिसात तक्रार केली आहे.

या प्रकरणाबाबत बोलताना शोच्या आयोजकांवर महिला स्पर्धकांनी फोटोसाठी टॉपलेस पोज देण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. मॉडेल्सचा आरोप आहे की, आयोजकांनी त्यांना सुमारे 20 लोकांसमोर टॉपलेस केलं आणि त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. आयोजकांनी मॉडेल्सची फसवणूक केली आणि फायनल राऊंडसाठी बॉडी चेकअप करावं लागेल असं सांगून त्यांना टॉपलेस केलं. यावेळी महिलांचे व्हिडिओही बनवण्यात आले. इंडोनेशियामध्ये या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे.

इंडोनेशिया हा इस्लामिक देश असून येथे सौंदर्य स्पर्धांना अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. अशा स्थितीत ही घटना लोकांपर्यंत पोहोचत असल्याने सर्वांमध्येच नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी आयोजकांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावर ना कंपनीने मालकाने काही बोलणे आवश्यक मानले ना प्रवक्त्याने यावर काही सांगितले. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचेही काही वृत्तांतून समोर आले आहे.

ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये लैंगिक छळ आणि कास्टिंग काउचच्या घटना वाढत आहे. अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. आधी स्त्रिया याबद्दल काहीही बोलायला घाबरायच्या. मात्र सोशल मीडियावर आल्यानंतर अनेक पीडित महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत खुलासा केला आहे. बॉलीवूडमध्ये #MeToo चळवळीअंतर्गत अनेक स्टार्सबद्दल खुलासे झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: miss universe indonesia contestants ordered topless photo videos body checks polie complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.