पाकिस्तानमध्ये अंडे ४०० रुपये डझन, चिकनही महागलं; महागाईने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 03:16 PM2024-01-15T15:16:31+5:302024-01-15T15:16:45+5:30

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळासोबत पाकिस्तानची पहिली समीक्षा पूर्ण झाली आहे

In Pakistan, eggs cost Rs 400 a dozen, chicken too; Citizens suffer from inflation | पाकिस्तानमध्ये अंडे ४०० रुपये डझन, चिकनही महागलं; महागाईने नागरिक त्रस्त

पाकिस्तानमध्ये अंडे ४०० रुपये डझन, चिकनही महागलं; महागाईने नागरिक त्रस्त

पाकिस्तानसमोर सर्वात मोठं आर्थिक संकट उभारलं असून महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला. पाकिस्तानसाठी ७० कोटी डॉलरच्या बेलआऊट फंडच्या चेकला मान्यता मिळाली. ही रक्कम अडचणीत असलेल्या पाकिस्तानला खूप उपयुक्त ठरणारी असून, मदतीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत थोडीफार सुधारणा होऊ शकते. मात्र, आजही पाकिस्तानमधील नागरिकांना महागाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे पाकिस्तानमध्ये १२ अंड्यांसाठी तब्बल ४०० रुपये मोजावे लागत आहेत. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळासोबत पाकिस्तानची पहिली समीक्षा पूर्ण झाली आहे. आयएनएफने आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची पहिली सुधारणा पूर्ण केल्यानंतर सध्याच्या ३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या बेलआऊट पॅकेजअंतर्गत पाकिस्तानला ७० कोटी अमेरिकन डॉलरच्या कर्जाच्या हप्त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे, पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला असून आर्थिक संकट दूर होण्यास थोडासा हातभार लागणार आहे. मात्र, तेथील नागरिकांसमोर अद्यापही महागाईचे संकट आ वासून उभे आहे. 

पाकिस्तानमधील वृत्तसंस्था एआरवायच्या अहवालानुसार, पाकिस्तानध्ये पुढील काही महिन्यांत सार्वजनिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे, विद्यमान सरकारसमोर महागाई आटोक्यात आणण्याचे मोठे संकट उभे आहे. मात्र, नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून महागाईने उच्चांक गाठला आहे. लाहोरमद्ये १५ जानेवारी रोजी १ डझन अंड्यांसाठी तब्बल ४०० रुपये मोजावे लागले. पाकिस्तानी चलनानुसार ही रक्कम ४०० रुपये एवढी आहे. तर, पाकिस्तानमध्ये कांद्याच्या किंमतीनेही नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. २३० ते २५० रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने कांद्यासाठी १७५ रुपले किलो दर निश्चित केला आहे. 

पाकिस्तानमध्ये चिकनही ६२५ रुपये किलो दराने विकले जात आहे. दैनंदीन गरजेच्या वस्तू अशा महाग होत असल्याने पाकिस्तानी नागरिकही त्रस्त बनले आहेत. येथे दूधही तब्बल २१३ रुपये लिटर आणि तांदूळ ३२८ रुपये किलो दरापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे, पाकिस्तानसमोर महागाई रोखणे किंवा कमी करणे हे सर्वात मोठे संकट असणार आहे. दरम्यान, भारताचा एक रुपये म्हणजे पाकिस्तानचे ३.३२ रुपये होतात. तर, भारतीय चलनानुसार १०० रुपये म्हणजे पाकिस्तानचे ३३२ रुपये होतात.

Web Title: In Pakistan, eggs cost Rs 400 a dozen, chicken too; Citizens suffer from inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.