गे पतीपासून दुस-यांदा झाला गरोदर

By Admin | Updated: June 1, 2017 14:47 IST2017-06-01T14:41:41+5:302017-06-01T14:47:18+5:30

34 वर्षीय ट्रिस्टन रीस आणि बिफ चाप्लॉ यांच्याकडे पुन्हा एकदा गोडबातमी आहे

Gay pregnant second pregnancy | गे पतीपासून दुस-यांदा झाला गरोदर

गे पतीपासून दुस-यांदा झाला गरोदर

>ऑनलाइन लोकमत
ऑरिगन, दि. 1 - 34 वर्षीय ट्रिस्टन रीस आणि बिफ चाप्लॉ यांच्याकडे पुन्हा एकदा गोडबातमी आहे. हे समलिंगी जोडपं आपल्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याची तयारी करत आहे. या समलिंगी दांपत्यामधील 34 वर्षीय ट्रिस्टन रीस पुन्हा एकदा गरोदर आहे. ट्रिस्टन रीस गरोदर होण्याची ही काही पहिलीच वेळ नसून याआधीही एकदा आपल्या गे पतीपासून तो गरोदर होता. 
 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार ट्रिस्टनला गेल्यावेळी गर्भपात करावा लागला होता. ऑरिगनमधील पोर्टलँडमध्ये राहणा-या या दांपत्याला यावेळी सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार 2016 मध्ये सहा महिन्यांच्या प्रेग्नन्सीनंतर ट्रिस्टनला गर्भपात करावा लागला होता. 
 
ट्रिस्टन रीस आणि बिफ चाप्लॉ यांनी लग्न केलेलं असून दोन मुलांनाही दत्तक घेतलं आहे. दुस-यांदा गरोदर होण्यासाठी या दांपत्याला खूप आव्हांनांना सामोरं जावं लागलं. अनेकदा आपलं हे मूल गमावण्याची भीती त्यांनी वाटत होती. 
 
रिपोर्टनुसार एका सकाळी ट्रिस्टनला आपली तब्बेत व्यवस्थित नसल्याचं जाणवलं. प्रेग्नन्सी टेस्ट केली असता आपल्याकडे खूशखबर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. बिफ आणि ट्रिस्टन पहिल्यांदा आपल्या अपघाती पालकत्वामुळे चर्चेत आले आहेत. 2011 रोजी बिफची बहिण आणि प्रियकराच्या भांडणामुळे त्यांच्या दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी या दांपत्याने घेतली होती. 
 

Web Title: Gay pregnant second pregnancy