एमा स्टोन ठरली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:26 IST2017-08-17T14:12:13+5:302017-08-17T14:26:01+5:30
सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे.

एमा स्टोन ठरली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री
मुंबई, दि. 17 - सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे. एमा स्टोन सर्वाधिक कमाई करणारी महिला असल्याचं फोर्ब्स मॅगझिनने घोषीत केलं आहे. 28 वर्षांच्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात 2.6 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 166.4 कोटी रूपये कमावले आहेत.
'ला ला लॅंड' या सिनेमात केलेल्या तगड्या अभिनयाचं बक्षीस म्हणून तिला ऑस्करकडून बेस्ट एक्ट्रेस या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. यावर्षी लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती. 'ला ला लॅंड' सिनेमाने जगभरात जवळपास 445 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.
या यादीत दुस-या क्रमांकावर अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा नंबर लागतो. जेनिफर एनिस्टनने गेल्या वर्षात 2.55 कोटी डॉलरची कमाई केली आहे. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ड्रामा फिल्म 'द येलो बर्ड' यामध्येही जेनिफर दिसली होती. याशिवाय ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर देखील आहे. या यादीत जेनिफर लॉरेन्स तिस-या क्रमांकावर आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या यादीत जेनिफर लॉरेन्स अव्वल होती. लॉरेन्सने गेल्या वर्षभरात 2.4 कोटी डॉलरची कमाई केली आहे. गेल्या वर्षीची तुलना केली असता तिची कमाई निम्मी जाली आहे. कारण गेल्या वर्षी तिने 4.6 कोटी डॉलर कमावले होते.
आणखी वाचा - (मुलासोबत हॉटेलमध्ये दिसली मॉडेल, राष्ट्रपतींच्या पत्नीने बदडलं)