चिनने पाकिस्तानला विकले मिसाईल ट्रॅकिंग सिस्टिम, भारत सावध  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 07:09 PM2018-03-22T19:09:03+5:302018-03-22T19:10:08+5:30

भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी बनलेल्या पाकिस्तानचे चीनशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. भारताला घेरण्यासाठी हे दोन्ही शेजारी नेहमीच कारवाया करत असतात. आता या दोन्ही देशांमधील मैत्री आर्थिक क्षेत्रामधून सामरिक क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे.

Chinle sold Missile tracking system to Pakistan | चिनने पाकिस्तानला विकले मिसाईल ट्रॅकिंग सिस्टिम, भारत सावध  

चिनने पाकिस्तानला विकले मिसाईल ट्रॅकिंग सिस्टिम, भारत सावध  

Next

बीजिंग -  भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी बनलेल्या पाकिस्तानचे चीनशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. भारताला घेरण्यासाठी हे दोन्ही शेजारी नेहमीच कारवाया करत असतात. आता या दोन्ही देशांमधील मैत्री आर्थिक क्षेत्रामधून सामरिक क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. याचाच एक भाग म्हणजे चीनने एक आश्चर्यकारक पाऊल उचलत पाकिस्तानला मिसाईट ट्रॅकिंग सिस्टिमची विक्री केली आहे. भारताने गुरुवारी केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या या करारावर भारत करडी नजर ठेवून आहे.
 या करारामुळे पाकिस्तानला आपला बहुआयामी अण्वस्त्रवाहून क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटता येणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या या कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानी सैन्याने या सिस्टिमचा वापर आपल्या एका फायरिंग रेंजजवळ करण्यासा सुरुवात केली आहे. तसेच त्यामाध्यमातून पाकिस्तानी सैन्य क्षेपणास्त्राला विकसित करण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली आहे. चायनिज इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या रिसर्चरमधून ही माहिती समोर आली आहे. सिचुआन प्रांताचे सीएएस इंस्टिट्युचे रिसर्चर जेंग मेंगवेई यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टकडे या कराराला दुजोरा दिला आहे.                    

Web Title: Chinle sold Missile tracking system to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.