चिनी मीडियानं उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 11:09 AM2017-07-31T11:09:36+5:302017-07-31T11:16:37+5:30

उत्तर कोरियानं न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचा दावाही केला आहे. ट्रम्प यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट ठरतेय

Chinese media ridiculed Donald Trump | चिनी मीडियानं उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली

चिनी मीडियानं उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर कोरियानं न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचा दावाही केलाचीननं उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर आणि क्षेपणास्त्र परीक्षण कार्यक्रमावर जबरदस्त दबाव बनवला आहेअमेरिकेनं दक्षिण कोरियात थाड मिसाइल सिस्टीमही तैनात केली आहे. त्यामुळे चीनच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

बीजिंग, दि. 31 - उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प म्हणाले होते, मी चीनमुळे खूप निराश आहे. आमच्या मागच्या नेत्यांनी त्यांना व्यापारात करोडो डॉलर कमावण्याची मोकळीक दिली होती. चीन उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर अमेरिकेसाठी काहीच करू शकत नाही. चीननं वार्तालापाशिवाय उत्तर कोरियाशी अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. चीन ही समस्या चुटकीसरशी सोडवू शकत होता. मात्र हे जास्त दिवस चालणार नाही, ही समस्या तात्काळ निकालात काढणार आहोत. अमेरिका सहयोगी देशांच्या संरक्षणाखातर शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

ट्विटवरून ट्रम्प यांचा मूड समजतो. उत्तर कोरियानं आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केल्याचं ऐकिवात आहे. उत्तर कोरियानं न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचा दावाही केला आहे. ट्रम्प यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट ठरतेय. ज्यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर सर्वाधिक महत्त्व दिलं आहे, असं ग्लोबल टाइम्समधून छापून आलं आहे. लेखानुसार, कारण नसताना ट्रम्प चीनवर टीका करत आहेत. कदाचित ट्रम्प यांना समजलं असेल चीन स्वतःचं धोरण बदलू शकत नाही. चीननं उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर आणि क्षेपणास्त्र परीक्षण कार्यक्रमावर जबरदस्त दबाव बनवला आहे. यूएन सुरक्षा परिषदेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी चीननं कठोर परिश्रम केले आहेत. उत्तर कोरियावर कोळसा आयात करण्यात बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या प्रतिबंधामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. स्वतःच्या शेजारील देशांची व्यापार करताना चीनला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. चीन उत्तर कोरियाची समस्या चुटकीसरशी सोडवू शकतो, ट्रम्प यांचं हे विधान फक्त अनुभव नसलेला राष्ट्राध्यक्षच देऊ शकतो. ज्यांना उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत फार काही माहिती नाही.

उत्तर कोरियानं अण्वस्त्र कार्यक्रम विकसित करण्याचा दृढ निश्चय केला आहे. त्याच्यावर अमेरिका-चीनच्या सैन्य धमकीची कोणताही फरक पडत नाही. अशातच चीनच्या  प्रतिबंधांचा त्याच्यावर काय फरक पडणार आहे. या समस्येचं निराकरण करायचे असल्यास अमेरिकेनं चीनवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तर अमेरिका उत्तर कोरियावर सैन्य दबाव बनवून प्रश्न सोडवतो आहे. कोरियन द्विपकल्पाच्या मुद्द्यावर अमेरिकेनं चीनला फार नुकसान पोहोचवलं आहे. अमेरिकेनं दक्षिण कोरियात थाड मिसाइल सिस्टीमही तैनात केली आहे. त्यामुळे चीनच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. व्यापाराच्या बाबतीतही ट्रम्प यांनी आम्हाला धमकी देऊ नये. चीन स्वतःच्या व्यापारी हितसंबंधांची सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे. अमेरिका-चीन व्यापार संबंध उत्तर कोरियाशी जोडणं हास्यास्पद असल्याचंही ग्लोबल टाइम्स या लेखातून छापून आलं आहे.

Web Title: Chinese media ridiculed Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.