काबूलमध्ये बॉम्बस्फोट; 1 ठार, 8 जखमी
By admin | Published: March 13, 2017 09:06 PM2017-03-13T21:06:31+5:302017-03-13T21:06:31+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका बसला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 13 - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका बसला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमध्ये देशातील एका मोठ्या नामांकित टेलिकॉम कंपनीच्या बसला लक्ष करुन हा बॉम्बस्फोट सोमवारी घडवून आणला. यामध्ये या कंपनीच्या कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. तर आठ कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी बसला वेढा घातला. मात्र, स्फोटात बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान, एका व्यक्तीने बसच्या खाली जाऊन आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणलाचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. मात्र, गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सेदिक सिदिक्की म्हणाले की, हा स्फोट रोडच्या बाजूला बॉम्ब ठेवून घडवून आणला.
तसेच, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याचे समजते.
1 killed & 8 injured in the roadside blast that took place in Kabul's PD10 area, reports TOLO News pic.twitter.com/i3ypMeKDYo
— ANI (@ANI_news) March 13, 2017