निवडणुकीच्या ९ दिवस आधी पाकिस्तानमध्ये रॅलीत बॉम्बस्फोट, इम्रान खान यांच्या पक्षाचे ४ नेते ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:29 PM2024-01-30T23:29:05+5:302024-01-30T23:31:38+5:30

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा मृत्यू झाला.

9 days before the election, a bomb blast in a rally in Pakistan, 4 leaders of Imran Khan's party were killed | निवडणुकीच्या ९ दिवस आधी पाकिस्तानमध्ये रॅलीत बॉम्बस्फोट, इम्रान खान यांच्या पक्षाचे ४ नेते ठार

निवडणुकीच्या ९ दिवस आधी पाकिस्तानमध्ये रॅलीत बॉम्बस्फोट, इम्रान खान यांच्या पक्षाचे ४ नेते ठार

पाकिस्तानमधील निवडणुका नऊ दिवसांनी होणार आहेत. त्या आधीच मोठ्या घडामोड घडल्या आहेत. रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाला. बलुचिस्तानमध्ये पीटीआयच्या निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार झाले. यातील मृत्यू झालेले व्यक्ती इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. इम्रान खान यांना सायफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पीटीआयने इम्रानच्या समर्थनार्थ निवडणूक रॅली काढली होती.

‘PM मोदी आणि भारतीयांची माफी मागा', मालदीवच्या विरोधीपक्ष नेत्याचा मोहम्मद मुइज्जूंना सल्ला

पीटीआयने बलुचिस्तानच्या सिबीमध्ये निवडणूक रॅलीचे आयोजन केले होते. इम्रान खान यांच्या तुरुंगवासाच्या विरोधात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाला, यामध्ये पीटीआयशी संबंधित ४ नेत्यांचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये ही घटना ८ फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नऊ दिवस आधी घडली आहे.

जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. बहुतांश जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.  घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचून परिसराची नाकेबंदी केली. 

पीटीआयने या घडामोडीवर एका निवेदनात म्हटले आहे की, एनए-253 मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवत असलेल्या पक्ष-समर्थित उमेदवार सद्दाम तरीन यांनी आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत हा बॉम्बस्फोट झाला. या घटनेत पीटीआयचे तीन कार्यकर्ते ठार झाले आणि सात जखमी झाले, तर तरीन सुरक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. "आम्ही या हृदयद्रावक घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पीटीआय कार्यकर्त्यांपेक्षा दहशतवाद्यांना शांत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे," अशी मागणी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये केली आहे.

Web Title: 9 days before the election, a bomb blast in a rally in Pakistan, 4 leaders of Imran Khan's party were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.