हिंगोलीत नामदेव महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत, रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:09 AM2018-07-05T06:09:52+5:302018-07-05T06:10:07+5:30

येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Welcoming welcome to Namdev Maharaj's palanquin in Hingoli, Lotus rush to the RINGUN SINGH | हिंगोलीत नामदेव महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत, रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

हिंगोलीत नामदेव महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत, रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

Next

हिंगोली : येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मागील २५ वर्षांपासून नर्सी नामदेव येथून निघणाऱ्या पालखीचे हिंगोलीकरांना मोठे आकर्षण असते, या क्षणाची वर्षभरापासून प्रतीक्षा केली जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून हिंगोलीत रिंगणाची परंपरा निर्माण झाली आहे. हिंगोली पालिकेच्या वतीनेही रिंगणाची तयारी केली होती. यंदा रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्यामुळे पहिल्यांदाच मैदानाच्या अगदी मधोमध रिंगण करण्यात आले होते. पालखीमध्ये वयोवृद्धांसह १० ते १५ वर्षांखालील मुले सहभागी झाले होते. शिवाय, डोक्यावर तुळस घेऊन महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रामलीला मैदानावर नियमितप्रमाणे पालखीची पूजाअर्चा करुन महाआरती घेण्यात आली. नंतर मान्यवरांचा व दिंडीतील सहभागी वारकºयांचा सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्यातील सहभागी चिमुकल्यांनी विविध देखावे सादर केले. भजनी मंडळीनी भजन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन सोडले. विविध चालींवरील भजने गातानाच पायाचा तालही धरला जात होता. नंतर मुख्य असलेल्या रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. यामध्ये मानाचा आश्व फिरविल्यानंतर इतर आश्वांनी रिंगणच दणाणून टाकले. बरेच घोडेस्वार घोड्यावर उभे राहून स्वारी करीत होते. त्यामुळे काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण अनेकजण डोळ्यात प्राण आणून पाहत होते. रिंगण पाहण्यासाठी आलेले महिला आणि पुरुष टाळ्या वाजवून घोडेस्वरांना प्रोत्साहित करीत होते. गतवर्षीपेक्षा यंदा मात्र अश्वांची संख्या वाढली होती.
पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Welcoming welcome to Namdev Maharaj's palanquin in Hingoli, Lotus rush to the RINGUN SINGH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.