विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:55 IST2018-06-10T23:55:38+5:302018-06-10T23:55:38+5:30

पसंत नाही म्हणून नांदविणार नसल्याचे सांगून ३० वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथे रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासरकडील १३ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Marriage attempt to burn alive | विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : पसंत नाही म्हणून नांदविणार नसल्याचे सांगून ३० वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथे रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासरकडील १३ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथील कार्तिका अमोल राठोड (३०) या विवाहितेस ‘तू आम्हाला पसंत नाहीस, तुला आम्ही नांदविणार नाही’ असे म्हणून रविवारी पहाटे ४ वाजता पती अमोल राठोड तसेच गुलाब राठोड, कांताबाई राठोड, शाहू पिराजी चव्हाण, पिराजी चव्हाण, परम चव्हाण, उत्तम पवार, सुमन पवार, संदीप राठोड, सचिन राठोड, प्रदीप राठोड, अंकुश पवार, अंबू भिमला राठोड या १३ जणांनी संगनमत करून कार्तिका झोपलेली असताना तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यावेळी ती ओरडत घराबाहेर पडली असता काही नागरिकांनी आग विझवून तिला औंढा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते; परंतु आगीत ७५ टक्केच्या वर भाजल्याने विवाहितेस नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. कार्तिका राठोड यांच्या फिर्यादीवरून १३ जणांवर जिवे मारण्याचा गुन्हा पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी नोंदविला. तपास सपोनि येरेकर करीत आहेत.

Web Title:  Marriage attempt to burn alive