अनेक प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी न होण्याची ही आहेत कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 04:45 PM2018-06-27T16:45:07+5:302018-06-27T16:47:24+5:30

तुमचं वाढलेलं पोट कमी होत नसेल तर तुम्ही कधी विचार केलाय का, की पोटावरील चरबी कमी का होत नाही? चला जाणून घेऊ काही कारणे...

This is why you dont loose your belly fat | अनेक प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी न होण्याची ही आहेत कारणं!

अनेक प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी न होण्याची ही आहेत कारणं!

Next

आजकाल अनेकजण हे वाढत्या पोटामुळे हैराण झालेले आहेत. पोट कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण अनेक प्रयत्न करुनही पोट काही कमी होत नाही. पोटाची वाढलेली चरबी अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देते. पण इतके प्रयत्न करुनही तुमचं वाढलेलं पोट कमी होत नसेल तर तुम्ही कधी विचार केलाय का, की पोटावरील चरबी कमी का होत नाही? चला जाणून घेऊ काही कारणे...

1) अल्कोहोलचं सेवन अधिक प्रमाणात करणे याचं एक मुख्य कारण आहे. अल्कोहोलच्या सेवनामुळे कॅलरी अधिक वाढतात. 12 आउंस बीअरमध्ये 153 कॅलरी असतात. अल्कोहोल दुसऱ्या प्रकारेही तुमचं वजन वाढवण्यात भूमिका बजावतो. अल्कोहोलच्या कॅलरी नष्ट करण्यासाठी शरीराच्या मेटाबॉलिज्मला फॅट बर्न क्रिया कमी करावी लागते आणि त्यामुळे फॅट बर्न होत नाहीत. 

2) वाढत्या वयासोबत शरीरातील मेटाबोलिक रेट कमी होतो. त्यामुळे शरीर योग्यप्रकारे काम करत नाही. जास्त महिलांची मासिळ पाळी बंद झाल्यानंतर त्यांच्या पोटावरील चरबी वाढणं सुरु होतं. मासिक पाळी बंद झाल्यानंतर होर्मोन्समध्ये बराच बदल होतो. त्यामुळे महिलांचं वजन वाढतं. 

3) त्यासोबतच खाण्यात व्हाईट ब्रेड, चिप्स, मिठाई आणि शरबतामध्ये जास्त साखर वापरल्याने व्यायाम केल्यावरही पोटावरील चरबी कमी होत नाही. जर तुम्हाला तुमचं वाढलेलं पोट कमी करायचं असेल तर फळे, भाज्यांचं सेवन करायला हवं. 

4) काही लोक हे पोट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाईज करतात. पण तरीही उपयोग होत नाही. याचं आणखी एक मुख्य कारण तणाव सुद्धा आहे. जास्त तणावामुळे स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोल शरीरात जाडेपणा वाढवण्यासोबतच फॅट सेल्सही वाढवतात. त्यामुळेही वजन कमी होत नाही. 

5) कमी झोप घेतल्यानेही जाडेपणा कमी होत नाही. 70 हजार महिलांवर 16 वर्ष करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे की, जे लोक पाच तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्या लोकांचं वजन वाढण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. 

6) काही लोकांच्या शरीराची रचनाच अशी असते की, त्यांच्या मांड्यासह त्यांचा जाडेपणा त्यांच्या पोटावरही दिसतो. जर तुमचा जाडेपणाही तुमच्या पोटावर दिसत असेल तर तुमच्या शरीराची रचनाही अॅप्पलसारखी असणार. ही एक जेनेटिक समस्या आहे. अशी शरीर रचना असलेल्या लोकांचं वजन कमी करणं फार कठीण असतं. 
 

Web Title: This is why you dont loose your belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.