...म्हणून सोबत राहणाऱ्या महिलांना एकाचवेळी येते मासिक पाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:11 PM2019-01-04T18:11:50+5:302019-01-04T18:15:29+5:30

मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेपणाने समाजात बोलले जात नाही. त्यामुळे याबाबत असलेल्या समस्या अनेकदा कोणाला उघडपणे विचारताही येत नाही.

Why do womens periods sync up when they are living together | ...म्हणून सोबत राहणाऱ्या महिलांना एकाचवेळी येते मासिक पाळी!

...म्हणून सोबत राहणाऱ्या महिलांना एकाचवेळी येते मासिक पाळी!

मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेपणाने समाजात बोलले जात नाही. त्यामुळे याबाबत असलेल्या समस्या अनेकदा कोणाला उघडपणे विचारताही येत नाही. अनेक महिला किंवा मुलींना याबाबत अनेक प्रश्न असतात. अशा अनेक प्रश्नांमधीलच एक प्रश्न म्हणजे, एकत्र राहणाऱ्या महिलांना किंवा मुलींना मासिक पाळी एकत्रच कशी येते? पेईंग गेस्ट, हॉस्टेल किंवा ऑफिसमध्ये एकत्र असणाऱ्या महिलांच्या मासिक पाळीची तारिख आस-पास किंवा सारखीच असते. याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नका. कारण यामागे असलेलं कारण वैज्ञानिक आहे. 

सतत एकत्र राहणाऱ्या महिलांमध्ये असलेल्या Pheromonesमुळे असं होतं. शरीरात होणाऱ्या अनेक रासायनिक बदलांपैकी असलेला हा एक बदल आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक लोकांच्या एकत्र राहण्यामुळे हा बदल उत्पन्न होतो. याच कारणामुळे अनेक महिला एकत्र राहत असतील तर त्यांची मासिक पाळी एकत्रच येते. 

'द यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड'मध्ये Biocultural Anthropology प्रोफेसर Alexandra Alvergne यांनी सांगितले की, Martha McClintock नावाच्या एका संशोधकाने अमेरिकेच्या कॉलेजमध्ये 135 महिलांच्या मासिक पाळीच्या चक्राचा अभ्यास केला. संशोधनामधून असं आढळून आलं की, या महिलांच्या मासिक पाळीच्या तारखा एकमेकींच्या पुढे-मागे किंवा समानच होत्या. तेच संशोधक Jeffrey Scha मासिक पाळीच्या तारिख सोबतचीच असण्याला निव्वळ एक योगायोग असल्याचे सांगतात. 

संशोधनावर बोलताना अनेकांनी असंदेखील सांगितलं की, आधीच्या वेळी महिलांची अशी रणनीति होती. पुरूषांनी एकाचवेळी अनेक महिलांसोबत शरीरसंबंध ठेवू नये म्हणून महिला असं कारण देत असतं. 1970मध्ये याबाबत करण्यात आलेले एक आंदोलन संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होते. 

Web Title: Why do womens periods sync up when they are living together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.