ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:17 AM2019-04-09T11:17:23+5:302019-04-09T11:19:57+5:30

ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते.

Warm olive oil beneficial or harmful? know the facts | ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक?

ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक?

Next

(Image Credit : thehealthsite.com)

ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. 

या तेलात हेल्दी फॅटी अ‍ॅसिड सोबतच अँटीऑक्सिडेंट्सही असतात. पण लोक मानतात की, यातील अनसॅच्युरेडेट फॅट्समुळे हे तेल पदार्थ तयार करण्यासाठी वापरता येत नाही. काही दावा करतात की, पदार्थांसाठी या तेलाचा वापर चांगला ठरतो. चला जाणून घेऊ या तेलाबाबत काय आणखीही काही....

द हेल्थ साइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा फॅट आणि ऑइल हार्ट हीटच्या संपर्कात येतं तेव्हा हार्टचं नुकसान होऊ शकतं. हे त्या तेलांबाबत सांगितलं जातं ज्यांमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट असतात. याप्रकारच्या तेलांमध्ये जास्तीत जास्त व्हेजिटेबल ऑइलचा समावेश केला जातो. जसे की, सोयाबिन किंवा ऑलिव्ह ऑइल. ओवर-हिट केल्यामुळे या तेलांमध्ये फार जास्त हानिकारक तत्वांची निर्मिती होते. यात lipid peroxides आणि aldehydes यांचा सहभाग आहे. या दोन प्रकारच्या तत्वांमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.

जेव्हा हे तेल गरम केलं जातं तेव्हा यातून carcinogenic compounds निघतं. जे श्वासासोबत शरीरात जाऊन फुप्फुसाच्या कॅन्सरची शक्यता वाढवतात. carcinogenic compounds चा धोका कमी करण्यासाठी केवळ त्याच फॅ्टससोबत पदार्थ तयार केले पाहिजे जे हाय हीटवर स्थिर राहतात. 

वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी तेलाचे दोन गुण जास्त महत्त्वाचे ठरतात. पहिला स्मोक पॉइंट म्हणजे ते तापमान ज्यावर चरबी वितळून धुरात रूपांतरित होते. आणि दुसरं म्हणजे Oxidative stability म्हणजेच जेव्हा फॅट ऑक्सिजन सोबत प्रतिक्रिया करतं. ऑलिव्ह ऑइल या दोन्ही गोष्टीमध्ये चांगलं परफॉर्म करतं. 

ऑलिव्ह ऑइलमध्ये जास्त मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं, जे हीट विरोधी असतं. अनेक रिसर्चमध्ये ऑलिव्ह ऑइलला हाय हीट केलं गेलं. यातून समोर आलं की, अशा स्थितींमध्ये सुद्धा ऑलिव्ह ऑइलने जास्त प्रमाणात हानिकारक तत्त्वांची निर्मिती केली नाही. 

सामान्यपणे तेलामध्ये फॅटी अ‍ॅसिडचा एका भाग मुक्त फॅटी अ‍ॅसिड असतं. तेलात जिकतं जास्त फॅटी अ‍ॅसिड असतं, तेवढाच कमी धुर होतो. एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑइलचा स्मोक पॉइंट 190–207°C इतका आढळला. हा पदार्थ तयार करण्यासाठी चांगला पर्याय सांगितला जातो.

Web Title: Warm olive oil beneficial or harmful? know the facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.