या थेरपींच्या मदतीने टेन्शनला करा रामराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 12:45 PM2018-07-02T12:45:02+5:302018-07-02T12:49:25+5:30

तणावामुळे अनेकांचं जगणं कठीण झालं आहे. अशात जगभरात तणावमुक्तीसाठी वेगवेगळे उपाय आले आहेत. यातील काही उपाय जाणून घेऊया.

These therapy keeps you away from tension | या थेरपींच्या मदतीने टेन्शनला करा रामराम!

या थेरपींच्या मदतीने टेन्शनला करा रामराम!

googlenewsNext

(Image Credit: readingroomdayspa.com)

जगभरातील लोकांना मोठ्या प्रमाणात तणावाची समस्या भेडसावत आहे. तणावामुळे अनेकांचं जगणं कठीण झालं आहे. अशात जगभरात तणावमुक्तीसाठी वेगवेगळे उपाय आले आहेत. यातील काही उपाय जाणून घेऊया.

अॅक्यूप्रेशर थेरपी

फार पूर्वीपासून अॅक्यूप्रेशर थेरपीचा प्रयोग केला जातो आहे. या थेरपीमध्ये रुग्णाच्या शरीराचे काही पॉईंट्सवर दबाव टाकून उपचार केले जातात. या थेरपीमुळे शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. ही थेरपी फारच फायदेशीर आहे.

म्युझिक थेरपी

प्रत्येकालाच संगीत आवडत असतं. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार संगीत ऐकत असतो. असे मानले जाते की, संगीतामुळे मन शांत होतं आणि तणाव कमी होतो. या थेरपीमध्ये व्यक्तीच्या स्वभाव, समस्यानुसार संगीत ऐकवलं जातं.  या थेरपीमुळे रुग्णाला मानसिक शांतता मिळते. 

नॅचरोथेरपी

अलिकडे वेगवेगळ्या आजारांवर नैसर्गिक उपचार केले जात आहे. तणावमुक्ती करण्यासाठीही या प्रकारच्या थेरपीचा वापर केला जातो. या थेरपीमध्ये रुग्णाला वेगवेगळ्या तेलांच्या आणि फुलांच्या सुगंधाच्या मदतीने तणावमुक्त केलं जातं. 

योगाभ्यास

जगभरात योगाभ्यासाचा प्रसार होत आहे. आजच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे. अशात तणावमुक्तीसाठी योगाभ्यासाकडेही सकारात्मकपणे पाहिले जात आहे. 

हसून घालवा तणाव

तणाव दूर  करण्यासाठी अलिकडे काही लाफ्टर क्लब चालवले जात आहे. तणाव दूर करण्यासाठी हसणे फार चांगला उपाय मानला जातो. 
 

Web Title: These therapy keeps you away from tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.