केसगळती थांबवण्यासाठी एकापेक्षा एक घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 04:57 PM2018-04-02T16:57:13+5:302018-04-02T16:57:13+5:30

घरगुती उपायांनीही केसगळती रोखली जाऊ शकते. या उपायांनी तुमची केसगळती तर थांबेलच सोबतच पैशांची बचतही होईल.

More than one home remedy to stop hairfalls! | केसगळती थांबवण्यासाठी एकापेक्षा एक घरगुती उपाय!

केसगळती थांबवण्यासाठी एकापेक्षा एक घरगुती उपाय!

Next

प्रदूषणामुळे आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे केसगळतीसारख्या समस्येला तोंड द्यावं लागतं. काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे. मात्र जर जास्त केस गळत असतील तर ही समस्या गंभीर आहे असे समजा...पण केसगळती थांबवण्यासाठी बाजारातून महागडी औषधं विकत घेण्याची गरज नाही. कारण घरगुती उपायांनीही केसगळती रोखली जाऊ शकते. या उपायांनी तुमची केसगळती तर थांबेलच सोबतच पैशांची बचतही होईल.

१) कांद्याचा रस

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

कसे कराल ?

एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा. रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. सौम्य शाम्पूने केस धुवा व ते सुकू द्या. आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा.

२) नारळ

केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

कसे कराल ?

नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा. तासाभराने केस धुऊन टाका किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा. रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

३) लसुण

कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते.

कसे कराल ?

लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या. त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या. हे  मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा. ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका. असे आठवड्यातून दोनदा करा.

4) जास्वंद

जास्वंद केसांना पोषण देतात, केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात. केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हे  जास्वंदाचे हेअर पॅक्स बनवू शकता.

कसे कराल ?

काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.

5) आवळा

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच चांगलाच फायद्याचा ठरतो. त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.

कसे कराल ?

आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. केस कोमट पाण्याने धुऊन टाका. 

6) अंड

अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कसे कराल ?

एका अंड्यातील पांढरा भाग एक चमचा ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.  १५ मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.
 

Web Title: More than one home remedy to stop hairfalls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.