कोणत्या कारणाने होते रात्री झोप न येण्याची समस्या? जाणून घ्या काय कराल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:39 AM2024-04-24T09:39:35+5:302024-04-24T09:40:17+5:30

ज्या लोकांमध्ये मेलाटोनिन कमी असतात त्यांना दिवसा झोप येते आणि थकवा जाणवतो. तर रात्री त्याना झोप न येण्याची समस्या होते.

Melatonin deficiency causes sleeplessness know the remedies | कोणत्या कारणाने होते रात्री झोप न येण्याची समस्या? जाणून घ्या काय कराल उपाय!

कोणत्या कारणाने होते रात्री झोप न येण्याची समस्या? जाणून घ्या काय कराल उपाय!

Sleeplessness : अनेक वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप येत नाही. तासंतास लोक बेडवर पडून असतात पण झोप काही येत नाही. यामागचं एक मोठं कारण म्हणजे मेलाटोनिन हार्मोनची कमतरता. मेलाटोनिन स्लीप हार्मोन (Sleep Hormone) असतो जो झोपेला रेग्युलेट करतो आणि याची कमतरता झाली झोपही कमी येते. मेलाटोनिन मेंदुच्या पिनिअल ग्लॅंममध्ये रिलीज होतात. याची निर्मिती सगळ्यात जास्त रात्रीच्या वेळी होते. 

मेलाटोनिन कमी झाल्याचे संकेत

ज्या लोकांमध्ये मेलाटोनिन कमी असतात त्यांना दिवसा झोप येते आणि थकवा जाणवतो. तर रात्री त्याना झोप न येण्याची समस्या होते. यामुळे  प्रोडक्टिविटीही कमी झाल्याचं बघायला मिळतं आणि व्यक्तीलाही फ्रेश वाटत नाही. तसेच लक्ष केंद्रित करण्यातही समस्या होते.

मेलाटोनिनची कमी झाल्यावर शरीरासाठी आवश्यक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही कमी होतात. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट शरीराचा ऑक्सिडेटिव डॅमेजपासून बचाव करतात. अशात जर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट कमी झाले तर शरीराला वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो.

झोप जर कमी झाली तर यामुळे त्वचाही प्रभावित होते. यामुळे डोळ्यांखाली काळे डाग म्हणजे डार्क सर्कल दिसू लागतात. तेच मेलाटोनिन कमी झाल्यावर शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित होऊ शकतं. अशात एजिंगची  प्रक्रिया वाढू शकते. म्हणजे कमी वयात तुम्ही म्हातारे दिसू शकता. 

मेलाटोनिनची कमी झालं तर इन्सोमेनिया म्हणजे झोप न येण्याच्या आजाराचा धोका वाढतो. यामुळे तणाव वाढतो आणि वजनही वाढतं. अशात मेटाबॉलिक डिसॉर्डर होऊ शकतो.

कशी दूर होईल ही समस्या

मेलाटोनिन हार्मोनची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. त्याशिवाय रात्री झोपण्याच्या दोन तासआधी काही खाऊ नका. फोन बघत झोपण्याचा प्रयत्न करू नका. दिवसा कितीही थकवा जाणवत असेल तर प्रयत्न करा की, दिवसा झोपू नका.
 

Web Title: Melatonin deficiency causes sleeplessness know the remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.