तुमच्या चालण्यावरून समजेल लिव्हर खराब झालं की नाही, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:25 AM2024-04-24T10:25:50+5:302024-04-24T10:26:18+5:30

Liver Health : अनेकदा लक्षण न दिसताही लिव्हर खराब झाल्याचं समजतं. या कंडिशनमध्ये केवळ ट्रान्सप्‍लांट हा एकमेव उपाय शिल्लक राहतो.

Liver Health : How can you know if the liver is damaged by your walk? | तुमच्या चालण्यावरून समजेल लिव्हर खराब झालं की नाही, जाणून घ्या कसं?

तुमच्या चालण्यावरून समजेल लिव्हर खराब झालं की नाही, जाणून घ्या कसं?

Liver Health : लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचन करण्यासोबतच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतं. त्याशिवाय लिव्हर दिवसभर 500 पेक्षा जास्त कामे करून शरीराचं कार्य व्यवस्थित ठेवतं.

जर लिव्हरमध्ये थोडीही खराबी झाली तर याचा प्रभाव थेट शरीराच्या कामकाजावर पडतो. अनेकदा लक्षण न दिसताही लिव्हर खराब झाल्याचं समजतं. या कंडिशनमध्ये केवळ ट्रान्सप्‍लांट हा एकमेव उपाय शिल्लक राहतो. काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही लिव्हर डॅमेजच्या समस्येपासून बचाव करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या चालण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

Express.co.uk च्या एका रिपोर्टनुसार, लिव्हर डॅमेजमुळे तुमचं वागणं, मूड, बोलण्याची पद्धत, झोप न येणे आणि चालण्यात समस्या होऊ शकतात. लिव्हर खराब झालं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या चालण्याची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत.

1) चालताना अचानक तुमच्या चालण्याचा वेग वाढतो किंवा मग तुम्ही हळूहळू चालणं सुरू करत असाल हा लिव्हर खराब झाल्याचा संकेत असू शकतो.

2) जर तुम्हाला चालता चालता अचानक पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे.

बऱ्याचदा काही संकेत किंवा लक्षण न दिसताच समजतं की, तुमचं लिव्हर खराब झालं आहे. यापासून बचाव करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करणं फार गरजेचं आहे. डोळे पिवळे दिसणे, पोट फुगणे, रक्ताची उलटी, विष्ठेचा रंग बदलणे, पोटात पाणी भरणे हे अॅडव्हांस स्टेजचे संकेत आहेत.

लिव्हरचा बचाव कसा करायचा

1) लाइफस्टाईलमध्ये बदल करा, बाहेरचे जंक-फास्ट फूड खाऊ नका आणि तळलेले भाजलेले पदार्थ खाऊ नका.

2) बॉडी बिल्डींगसाठी डबा बंद प्रोटीन आणि स्टेरॉयड घेणं टाळा.

3) नियमितपणे हेल्थ चेकअप करत रहा. 

4) जवळपास 40 ते 45 टक्के लिव्हर रूग्णांमध्ये अल्कोहोल जबाबदार असतं. अशात दारूचं सेवन टाळा.

5) शरीरात चरबी जमा होऊ देऊ नका. रोज किमान 20 मिनिटे वॉक करा.
 

Web Title: Liver Health : How can you know if the liver is damaged by your walk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.