बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:41 AM2023-06-21T09:41:19+5:302023-06-21T09:41:33+5:30

International Yoga Day 2023 : अलिकडे वाढलेली लठ्ठपणाची समस्याही योगाच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तीन आसने सांगणार आहोत.

International Yoga Day 2023 : 3 best yoga asanas for reduce belly fat and weight loss- | बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

googlenewsNext

International Yoga Day 2023 : जगभरात 21 जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो. अनेकांनी दावा केला आहे की, तुम्ही नियमितपणे योगाभ्यास केला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहतं. अशात अलिकडे वाढलेली लठ्ठपणाची समस्याही योगाच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तीन आसने सांगणार आहोत.

त्रिकोणासन, सर्वांगासन आणि वीरभद्रासन ही तीन आसने तुम्ही जर नियमितपणे केली तर तुमच्या पोटावरील चरबी तर कमी होईल, सोबतच कंबरेच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी सुद्धा कमी होईल.

त्रिकोणासन

जर तुमच्या पोटावर चरबी जमा झाली असेल तर त्रिकोणासन तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतं. तसेच या आसनामुळे पचनक्रियाही सुधारते. सोबतच पोट आणि कंबरेच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी कमी करण्यासही मदत मिळते. या आसनामुळे शरीरात ब्लड फ्लो सुरळीत होतो. 

सर्वांगासन

वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर सर्वांगासन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या आसनामुळेही पचन सुधारतं आणि शरीराला मजबुती मिळते. मेटाबॉलिज्म मजबूत होतं याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळतो. तसेच या आसनामुळे मांसपेशी आणि पाय सुद्धा मजबूत होतात. सोबतच श्वसन प्रक्रियाही सुधारते.

वीरभद्रासन

जर तुम्हाला मांड्या आणि खांडे टोन करायचे असेल तर हे वीरभद्रासन तुम्हाला मदत करेल. वीरभद्रासन केल्याने कंबरेच्या खालचा भाग, पाय आणि खांदे टोन करण्यासाठी फायदा मिळतो. तसेच याने पोटावरील चरबी सुद्धा कमी होते.

Web Title: International Yoga Day 2023 : 3 best yoga asanas for reduce belly fat and weight loss-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.