वजन कंट्रोल करायचं असेल तर 'या' सूपचं करु नका सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 11:11 AM2018-09-07T11:11:39+5:302018-09-07T11:11:56+5:30

काही सूप्सना लिक्विड जंक फूड म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. कारण यात जास्त प्रमाणात कॅलरी असल्याने आपल्या आरोग्याला वेगवेगळं नुकसान पोहचवू शकतात. 

If you want to control weight, do not eat these soup! | वजन कंट्रोल करायचं असेल तर 'या' सूपचं करु नका सेवन!

वजन कंट्रोल करायचं असेल तर 'या' सूपचं करु नका सेवन!

सर्वांनाच हे माहीत आहे की, सूप आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. पण याचा अर्थ असा नाही होत की, सगळ्यात प्रकारचे सूप आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. काही सूप्सना लिक्विड जंक फूड म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. कारण यात जास्त प्रमाणात कॅलरी असल्याने आपल्या आरोग्याला वेगवेगळं नुकसान पोहचवू शकतात. 

चावडर सूप

या सूपच्या टेस्टची आठवण होताच अनेकजण हे सूप का सेवन करु नये असे विचारु शकतात? पण सत्य हे आहे की, क्रिम आणि दुधापासून तयार चावडर सूपमध्ये कॅलरी भरपूर प्रमाणात असतात. याच कारणाने चावडर सेवन करणे टाळले पाहिजे. चावडर तयार करण्यासाठी मका आणि इतरही काही गोष्टींचा वापर केला जातो. तरी सुद्धा आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर हे टाळाच.

ब्रोकली आणि चीज

(Image Credit : www.foodandwine.com)

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या सूपमध्ये ब्रोकली आहे तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. पण हे खरं नाहीये. खासकरुन तेव्हा जेव्हा ब्रोकलीचं सूप चीजपासून तयार केलं असेल. साधारणपणे ब्रोकली आणि चीजच्या सूपमध्ये ब्रोकलीचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे हे सूप हेल्दी होण्याऐवजी चीजमुळे अनहेल्दी होतं. असे आढळून आले आहे की, ब्रोकलीपासून तयार सूपमध्ये जवळपास ३०० कॅलरी असतात. त्यामुळे हे सूप चवीला तर चांगलं असतंच पण आरोग्यासाठी चांगलं नसतं.

मिरचीपासून तयार सूप

(Image Credit : www.healthyfood.co.nz)

जनरली मिरचीपासून सूप चटपटीत लागतात. याच कारणामुळे लोक सर्वच प्रकारच्या सूपमध्ये मिरची टाकणे पसंत करतात. पण याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक प्रकारच्या सूपमध्ये मिरची टाकणे आरोग्यासाठी चांगले असते. 

बटाट्याचं सूप

(Image Credit : BBC.Com

बटाट्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन्स सी असतात. याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. पण बटाट्याच्या सूपमध्ये क्रिमचा वापर केल्यास ते सूप आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यासोबतच बटाट्याच्या सूपमध्ये बॅकन आणि चीजचाही वापर होतो. याच कारणाने हे सूप आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. 

ब्रेड बाऊलमध्ये सूप

(Image Credit : Pillsbury.com)

जर तुम्ही ब्रेड बाऊलमध्ये सूप सेवन केलं तर तुम्ही कोणतं सूप सेवन करताय याने काही फरक पडत नाही. कारण ब्रेड बाऊलमध्ये टाकलं गेलेलं कोणतही सूप हे आरोग्याच्या दृष्टीने बेकार होतं. यात ६०० पेक्षा अधिक कॅलरी असतात तर १३०० मिग्रा पेक्षा अधिक सोडियम असतात. त्यामुळे तज्ज्ञांनुसार नियमीत हे सूप सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

पर्याय

सूप निवडताना या गोष्टीची काळजी घ्या की, त्यात कॅलरी कमी असाव्यात. तसेच सोडियमचं प्रमाणही अधिक नसावं. यासाठी तुम्ही मुळा, गाजर, टोमॅटो, चिकन ब्रेस्ट, कांदा, एग नूडल्स इत्यादी सूप घेऊ शकता.
 

Web Title: If you want to control weight, do not eat these soup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.