HEALTH: Increasing weight due to 'these' mistakes after lunch! | HEALTH : ​दुपारच्या जेवणानंतर ‘या’ चुकांमुळे वाढते वजन !

वाढलेले वजन कमी करुन स्लिम आणि फिट राहण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी खूपच प्रयत्न करताना दिसतात. ठरविल्याप्रमाणे त्यांचे वजन कमी देखील होते. त्यांचेच अनुकरण करुन आपणही तसा प्रयत्न करतो, मात्र आपल्या काही चुकांमुळे आपले वजन कमी होत नाही. एका अभ्यासानुसार दुपारच्या जेवणानंतर आपल्या अशा काही सवयी असतात, ज्यामुळे आपले वजन वाढत नाही. जाणून घेऊया त्या सवयींबाबत...

* दुपारी जेवल्यानंतर झोपणे किंवा डेस्कवर, एका ठिकाणी बसून राहणे योग्य नाही. यामुळेही वजन वाढते. म्हणून काही वेळाने थोडं चाला, फिरा, काहीतरी हालचाल करा. तुम्ही सकाळी व्यायाम करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बसून राहणे योग्य आहे. सतत काहीतरी हालचाल करणे गरजेचे आहे. 

* दुपारच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. एखाद्या दिवशी गोड खाणे चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणे टाळा. 

* एखादा खास प्रसंग, सेलिब्रेशन असल्यास गोड खाण्यास हरकत नाही. परंतु, त्याचे प्रमाण मर्यादित असावे. कूकीज, चॉकलेट सारखे गोड पदार्थ बघून खाण्याची इच्छा होणे, स्वाभाविक आहे. परंतु, खूप भूक लागल्याशिवाय असे पदार्थ खाऊ नका. 

* जेवल्यानंतर लगेचच कॉफी घेतल्यास कॉफीत असलेल्या कॅफेनमुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तसेच कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच अ‍ॅसिडिक पदार्थ घेणे किंवा खाणे त्रासदायक ठरू शकते.  

* एका अभ्यासानुसार जे लोक दुपारी ३ नंतर जेवण घेतात त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. कारण त्यामुळे मेटॅबॉलिझमच्या प्रक्रीयेत अडथळे येतात.

Also Read : ​HEALTH ALERT : ​सकाळच्या ‘या’ सहा वाईट सवयींमुळे वाढते वजन !
Web Title: HEALTH: Increasing weight due to 'these' mistakes after lunch!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.