HEALTH: Hitchcant's sister has been divorced twice, "this" was suffering from the disease! | ​HEALTH : ऋतिकच्या बहिणीचा दोनदा झाला आहे घटस्फोट, "या" आजाराने होती त्रस्त !

अभिनेता ऋतिक रोशनची मोठी बहिण सुनैना रोशनचे काही फोटो नुकतेच व्हायरल झालेत, त्यात ती अगोदरपेक्षा खूपच सडपातळ आणि वेगळी दिसत होती. सुनैनाने नुकतेच तिचे वजन घटविले म्हणून तिचा लुक असा बदलला. विशेष म्हणजे तिच्या आयुष्यात खूप मोठ्या समस्या होत्या. तिचा एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट झाला आहे.

सुनैनाने फॅशन डिझायनर आशिष सोनीसोबत लग्न केले होते. आशिष असे एकमेव फॅशन डिझायनर आहेत, ज्यांना न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘आॅलिंपस फॅशन वीक’ मध्ये बोलविण्यात आले होते. दोघांना सुरानिका नावाची मुलगीदेखील आहे. मात्र अवघ्या आठच वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. मात्र सुरानिका वडिलांजवळ राहते. त्यानंतर २००९ मध्ये सुनैनाने दुसरे लग्न मोहन नागरसोबत केले मात्र हे लग्नही जास्त काळ टिकले नाही आणि दोघेही विभक्त झाले.  

एवढेच नव्हे तर २००८ मध्ये सुनैना कॅन्सरने ग्रस्त झाली. जेव्हा ती तिचे वडिल राकेश रोशन सोबत ‘क्रेझी-४’ या चित्रपटासाठी काम करीत होती तेव्हा तिला समजले की, तिला सर्वाइकल कॅन्सर आहे. तेव्हा मात्र पूर्णत: खचली होती. मात्र यावेळी तिचा भाऊ ऋतिक रोशनने तिला खूप साथ दिली. ऋतिकने सुनैनावर सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करुन घेतला आणि अवघ्या दोन दिवसाच्या आतच पहिली किमोथेरपीदेखील केली. सुनैनाला तिचे केस खूपच आवडायचे मात्र या आजारामुळे तिला तिचे केस गमवावे लागल्याने तिला खूप दु:ख झाले होते.     

या व्यतिरिक्त ऋतिकची ब्रेन सर्जरी आणि त्यांनतर सुजैनसोबत त्याचा घटस्पोट या कारणांनी सुनैना खूप त्रस्त झाली होती आणि डिप्रेशनमध्येही गेली होती. त्यानंतर तिचे आहाराचे प्रमाण जास्त वाढले, त्यामुळे तिला डायबिटीज आणि फॅटी लीव्हरच्या समस्या निर्माण झाल्या. या सर्व कारणांनी तिचे वजन खूपच वाढले. मात्र तिने आता बैरिएट्रिक सर्जरी करुन सुमारे ६० किलो वजन घटविले आहे. वजन घटविल्यानंतर मात्र ती आता पहिल्यापेक्षा वेगळी आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

Also Read : ​१३० किलो वजन असलेल्या सुनैनाला लोक म्हणायचे, ‘खरंच तू हृतिक रोशनची बहीण आहेस काय?
Web Title: HEALTH: Hitchcant's sister has been divorced twice, "this" was suffering from the disease!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.