वर्ल्ड बिकिनी चॅम्पियनचा पुरस्कार मिळविणारी २९ वर्षीय क्रिस्टिना सिल्वाने नुकतेच आपल्या फिटनेसचे रहस्य आपल्या चाहत्यांना जाहिर केले आहे. फिटनेस तिच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा भाग असून ती तिच्या मस्कुलर बाडीमुळे खूपच हेल्दी फिल करते. क्रिस्टिना सध्या सेलेब्रिटीज फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. फिटनेसबाबत बोलताना तिने सांगितले की, फिटनेसमध्ये बॉडीच्या कंपोजिशनवर लक्ष देणे गरजेचे असते. आधी शरीरात फॅट तयार करावी मग त्याचे रूपांतर मसल्समध्ये करता यायला पाहिजे. तसेच ती डायटबाबत काही खास सूचना करत नाही कारण प्रत्येकाच्या बॉडीला ते काही सूट होईलच असे नसते. - डायट खरंतर आपल्या बॉडी टाईपप्रमाणे घ्यायचा असतो. माझ्याबाबत बोलायचे झाल्यास, मी कोणत्याही प्रकारचा डायट फॉलो करत नाही.  
- फिटनेस मूळचा तुमच्या लाइफस्टाइलच्या बॅलेंसिंगद्वारे येतो. जसे क्लीन आणि हेल्दी जेवण, ज्यात प्रोसेस्ड फूड किंवा शुगर नसणे.
- अशा आहारासोबत फक्त आपल्याला नियमितरित्या मेहनत करायची आहे. त्यामुळे तुमची लाइफस्टाइल आपोआप त्यात फिट बसते.

क्रिस्टीना म्हणते की, फिटनेसमध्ये बॉडीच्या कंपोजिशनवर लक्ष देणे गरजेचे असते.

- सोशल मीडियात तर अ‍ॅक्टिव आहे पण मला सोशलाईज होणे पसंत नाही कारण यामुळे माझे फिटनेस रुटीन बिघडते. 
- खाण्याच्या वस्तूकडे मी फारसे पाहत नाही कारण त्यामुळे खायचे मन होईल आणि भूकही लागेल व वाढेल.    
- स्वत:ला बेस्ट बनविण्यासाठी वर्कआउट करत असते, अ‍ॅथलेटिक बॉडी बनवायची आहे आणि मला अ‍ॅडवेंचर स्पोर्ट्सची आवड आहे. 

ती असेही सांगते की, आधी शरीरात फॅट तयार करावी मग त्याचे रूपांतर मसल्समध्ये करता यायला पाहिजे.

- वेळ मिळताच मी स्केटिंग करते तसेच पार्क, गार्डनमध्ये जाऊन मोकळा श्वास घेते ज्यामुळे ताजेतवाणे वाटते.
- मला अ‍ॅथलीट सारखे फिजिक बनवायची आहे जेणेकरून शारीरिकदृष्ट्या मी मजबूत बनेन. 

कारण प्रत्येकाच्या बॉडीला ते काही सूट होईलच असे नसते.

- क्रिस्टीना सांगते की, प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेगवेगळी असते त्यामुळे मुलींना मी सल्ला देईन की, जिममध्ये जाण्यास घाबरू नका.
- काही ना काही उचलण्याचा प्रयत्न करा आणि कारण त्यातून अंग दुखते आणि तेथूनच खरे तर फिटनेसची सुरुवात होते. 

source : divyamarathi

Also Read : ​Fitness : ‘हे’ आहे मलाइका अरोडाचे फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित !
                   : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !

Web Title: Fitness: 'World Bikini Champion' Christina Silva made a muscular body!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.