वाढलेलं पोट आत घ्यायचं असेल तर रोज या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 10:40 AM2018-06-07T10:40:49+5:302018-06-07T11:55:03+5:30

तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये बदल करावा लागेल. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं बाहेर आलेलं पोट आत घेऊ शकता. 

Fitness Tips : Exercises for flat stomach | वाढलेलं पोट आत घ्यायचं असेल तर रोज या गोष्टींची घ्या काळजी!

वाढलेलं पोट आत घ्यायचं असेल तर रोज या गोष्टींची घ्या काळजी!

(Image Credit:www.nowloseit.com)

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात फास्टफूडमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यात बदललेल्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेकांना वाढत्या वजनाचा अधिक सामना करावा लागतो आहे. अनेकांना वाढत्या पोटाची चिंता लागलेली असते. पण केवळ चिंता करुन बाहेर आलेलं पोट आत जाणार नाही. त्यासाठी तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये बदल करावा लागेल. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं बाहेर आलेलं पोट आत घेऊ शकता. 

काय करावे?

- सामान्यपणे दररोज व्यायाम करुनही तुम्ही पोट सपाट करु शकता. पण तुम्हाला कमी दिवसात हे करायचं असेल तर तुम्हाला काही खास पद्धतीचे व्यायाम करायला हवे. 

- तुम्हाला पोट कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये बदल करावा लागेल. त्यासोबतच कधीची न चुकता रोज व्यायाम करावा लागेल. अनेकजण असा विचार करतात की, ते काहीपण खात राहिले आणि व्यायाम करत राहिले तर ते एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करु शकतील. पण हे केवळ त्यांचा भ्रम आहे. 

- दे गा हरी पलंगावरी असं चालणार नाही. तुम्हाला तुमचं वाढलेलं पोट कमी करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींची माहिती जमवावी लागेल. कोणत्या प्रकारची डाएट असायला हवं याची माहिती घ्यायला हवी. 

- तुम्हाला रोज कमीत कमी अर्धातास वेगात चालावं लागेल. ठरलेले व्यायाम रोज करावे लागतील. वेगात चालण्याने तुमच्या मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. 

- आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा अॅब्ससाठीचा व्यायाम करा. जेणेकरुन तुमच्या शरीरातील फॅट कमी होईल. यासोबतच दंड बैठका करु नका कारण त्याने पोट आत जाण्यास मदत होणार नाही. 

- पोट कमी करण्यासाठी कमी शुगर घेणे फारच गरजेचे आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, शुगरमुळे फॅट वाढतात आणि पोट आणखी बाहेर येतं. 

- तसे तर पोट आत घेणे फार कठीण काम नाहीये. पण त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे. कपालभाती हे योगासन पोट आत घेण्यासाठी फारच फायदेशीर ठरेल. याने तुमच्या मांसपेशी मजबूत होतात आणि पोटही कमी होतं. पण हे आसन करताना एक्सपर्टचे मार्गदर्शन नक्की घ्या.

- आपल्या डाएटमध्ये फायबरचं प्रमाण वाढवा. ब्रेड, पास्ता, बटाटे, भात योग्य प्रमाणात खावे. ब्राऊन राईस खाल्यास अधिक फायदा होतो. फळे आणि भाज्याही खाव्यात. बाहेरचे तेलकट पदार्थ खावू नये.

Web Title: Fitness Tips : Exercises for flat stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.