तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता? कसे तपासाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:21 AM2019-03-11T10:21:09+5:302019-03-11T10:25:03+5:30

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये नेहमीच लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

Ask yourself these question to know if you are following a healthy lifestyle | तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता? कसे तपासाल?

तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता? कसे तपासाल?

googlenewsNext

(Image Credit : TheReal.com)

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये नेहमीच लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या लाइफस्टाइलवर लक्ष देत नसल्याकारणाने लोक कमी वयातच वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. डायबिटीज, हायपरटेंशन, आर्थरायटिससारखे आजार फार सामान्य झाले आहे. अशात चांगली लाइफस्टाइल फॉलो करण्यासोबतच हेल्थ चेकअपही गरजेचं आहे. रूटीन चेकअपसोबतच काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

जर तुम्हाला हेल्दी रहायचं असेल तर तुम्हाला काही हेल्दी सवयी लावून घ्याव्या लागतील. वेळ आली आहे की, स्वत: या सवयींबाबत स्वत:ला प्रश्न करा की, काय तुम्ही या गोष्टी फॉलो करत?

सकाळी कोमट पाणी सेवन करता? 

सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी पिणे फायदेशीर असतं. याने शरीरातील चरबी तर कमी होतेच, तसेच याने पोटही चांगली आणि निरोगी राहतं. 

हेल्दी ब्रेकफास्ट करता? फळं खाता? 

चांगल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येणारी फळं-भाज्या खाणे फायदेशीर असतं. यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. आजकाल संत्री, गाजर, द्राक्ष, मटर भरपूर मिळतात. यांचा डाएटमध्ये समावेश करा. असे म्हणतात की, ब्रेकफास्ट राजासारखा करावा, लंच सामान्य व्यक्तीसारखं आणि डिनर गरीबासारखं करावं. म्हणजे पोटभर नाश्ता फार महत्त्वाचा आहे. 

तुम्ही पायऱ्यांचा वापर करता?

जेवढा शक्य असेल तेवढा ऑफिस, मॉल किंवा कुठेही लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा. याने कॅलरी बर्न होतात आणि शरीरही अॅक्टिव्ह राहतं. तसेच तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो. कारण पायऱ्यांचा वापर करून शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो. 

भरपूर व्हिटॅमिन सी चं सेवन करता?

व्हिटॅमिन-सी शरीरासाठी फार फायदेशीर आहे. याने शरीराती इम्यूनिटी मजबूत होते. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. वेगवेगळ्या आजारांशी लढण्याशी क्षमताही वाढते.  

किचन आणि बाथरूम स्वच्छ ठेवता?

चांगला आणि पौष्टीक आहार जितका चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो, तितकीच खासकरून किचन आणि बाथरूमची स्वच्छताही महत्त्वाची असते. या दोन्ही अशा जागा आहेत जिथे सर्वात जास्त अस्वच्छता असते. तसेच सर्वात कमी लक्ष याच ठिकाणांकडे दिलं जातं.  

एक्सरसाइज करता का?

चांगला आहार, स्वच्छता, यासोबतच चांगल्या आरोग्यासाठी नियमित एक्सरसाइज करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक्सरसाइज केल्याने शरीर फिट राहतं आणि तुम्हाला एनर्जेटिकही वाटतं. 

Web Title: Ask yourself these question to know if you are following a healthy lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.