'या' ६ सोप्या एक्सरसाइज करून शरीरासोबतच हार्ट ठेवा फिट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 11:58 AM2019-05-01T11:58:27+5:302019-05-01T11:58:58+5:30

तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही खास वर्कआउट किंवा एक्सरसाइज कराल तर तुमचं हृदय हेल्दी ठेवण्यास मदत मिळते.

6 workouts and exercise that will keep your heart strong | 'या' ६ सोप्या एक्सरसाइज करून शरीरासोबतच हार्ट ठेवा फिट! 

'या' ६ सोप्या एक्सरसाइज करून शरीरासोबतच हार्ट ठेवा फिट! 

googlenewsNext

हृदयरोगांचा थेट संबंध हा शारीरिक हालचालींशी असतो. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही खास वर्कआउट किंवा एक्सरसाइज कराल तर तुमचं हृदय हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. अनेकजणांना आळस येतो, त्यामुळे ते एक्सरसाइज करत नाहीत. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सोप्या आणि सहज करता येणाऱ्या एक्सरसाइज घेऊन आलो आहोत. या सोप्या एक्सरसाइज करून तुम्ही हृदय फिट ठेवू शकता. 

रोज एक्सरसाइज केल्याने वजन तर कमी होतंच सोबतच शारीरिक मजबूतीही मिळते. हृदयरोग होण्याच्या मुख्य कारणांमध्ये एक्सरसाइज न करणं, शारीरिक हालचाल न करणे ही आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ६ सोप्या एक्सरसाइज सांगणार आहोत. ज्या तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.

वॉक करा

(Image Credit : besthealthmag.ca)

जर तुम्ही नियमितपणे वॉक कराल तर तुम्ही फिट रहाल. तुम्ही फिट रहाल तर हृदयाचे आजार तुमच्यापासून दूर राहतील. रोज वॉक केल्याने हृदयरोगांचा धोका कमी होतो. जर तुम्ही नियमितपणे ३० ते ४० मिनिटे वॉक कराल तर तुम्हाला फायदा होईल. 

स्वीमिंग करा

(Image Credit : Video Blocks)

स्वीमिंग करणे हा शरीरासाठी सर्वात चांगला आणि एक परिपूर्ण व्यायाम मानला जातो. स्वीमिंग केल्याने शरीराच्या सर्वच अवयवांची एकत्र एक्सरसाइज होते. रोज ३० मिनिटे स्वीमिंग केल्याने हृदयरोग दूर राहतात. स्वीमिंग केल्यावर तुम्ही दुसरी कोणती एक्सरसाइज केली नाही तरी चालतं. 

एरोबिक्स

एरोबिक्स एक्सरसाइज आजच्या काळात सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. ३० मिनिटे रोज एरोबिक्स एक्सरसाइज केली तर तुम्हाला हृदयासंबंधी समस्या होण्याचा धोका कमी असतो. जॉगिंग, रनिंग, सायकलिंग हे सर्व प्रकास एरोबिक्समध्ये येतात. 

पायऱ्या चढणे

(Image Credit : The National)

जर तुम्ही रोज एक्सरसाइज करू शकत नाहीत तर तुम्ही रोज लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करायला हवा. याने एक्सरसाइज होते सोबतच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो, ज्यामुळे हृदयही निरोगी राहतं. 

डान्स करा

(Image Credit : YouTube)

मजबूत हृदयासाठी डान्स करणं ही सुद्धा एक चांगली एक्सरसाइज आहे. जर तुम्ही रोज डान्स करत असाल तर तुम्हाला दुसरी एक्सरसाइज करण्याची गरज भासणार नाही. कारण डान्स हीच एक चांगली एक्सरसाइज आहे. 

स्ट्रेचिंग

(Image Credit : suzannefaith.com)

स्ट्रेचिंग करणे सुद्धा हृदयसाठी फायदेशीर आहे. शरीराचे अंग जेव्हा नियमित स्ट्रेच होतात तेव्हा हृदय मजबूत राहतं. स्ट्रेचिंग करताना याची काळजी घ्यावी की, शरीराच्या क्षमतेपेक्षा अधिक स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करू नये.

Web Title: 6 workouts and exercise that will keep your heart strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.