सकाळी उठल्यावर २७ मिनिटे करा हे काम, पूर्ण दिवस जाईल चांगला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 11:13 AM2018-09-08T11:13:54+5:302018-09-08T11:14:12+5:30

दिवसाची सुरुवात कशी होते याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो. काही अभ्यासांनुसार, आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करुन आपला दिवस चांगला घालवू शकतो. 

27 minutes morning routine can make you happy and successful | सकाळी उठल्यावर २७ मिनिटे करा हे काम, पूर्ण दिवस जाईल चांगला!

सकाळी उठल्यावर २७ मिनिटे करा हे काम, पूर्ण दिवस जाईल चांगला!

Next

अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, दिवसाची सुरुवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची सुरुवात कशी होते याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो. काही अभ्यासांनुसार, आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करुन आपला दिवस चांगला घालवू शकतो. 

जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने, हसत आणि सकारात्मकपणे करायची असेल तर सकाळी काही गोष्टींचा २७ मिनिटांसाठी तुमच्या रुटीनमध्ये समावेश करा. याने तुमच्या जीवनात नक्कीच बदल दिसेल. चला जाणून घेऊ काय करण्याची गरज आहे. 
सकाळी उठल्यावर सर्वातआधी स्वत:ला स्ट्रेस फ्रि करा. जास्त स्ट्रेस घेतल्याने शारीरिक आणि मानसिक रोग होण्याची शक्यता असते. जर सकाळी आनंदी रहाल तर दिवसही चांगला जाईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज करा. 

स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी सेंटर फॉर कंपॅशन अॅन्ड अल्ट्रयूइज्म रिसर्च अॅन्ड एज्युकेशनच्या प्रोफेसर Emma Seppälä यांनी सांगितले की, केवळ सामान्यपणे श्वास घेऊन तणाव कमी केला जाऊ शकत नाही.

आपल्या ब्लॉगवर Seppälä यांनी श्वास घेण्याची प्रक्रिया आणि सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टम यांच्यातील संबंध सांगितला आहे. त्यांचं मत आहे की, सकाळी ५ मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज केल्याने शरीरातून स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी केला जाऊ शकतो. याने तुमचा मूड चांगला राहिल.

तीन अशा गोष्टी ज्याने तुम्हाला आनंद मिळतो

ब्रीदिंग एक्सरसाइज व्दारे आपला मूड ठिक केल्यानंतर रोज सकाळी २ मिनिटे अशा गोष्टींबाबत लिहा ज्या असल्याने तुम्ही स्वत:ला भाग्यवान समजता. असे केल्याने तुमच्या डोक्यात केवळ सकारात्मक गोष्टींचाच विचार येते. याने तुम्हाला दिवसभर आनंदी राहण्यास मदत मिळेल. अभ्यासकांनुसार, सकारात्मक असल्याने आपला मेंदू आणखी चांगलं काम करतो. याने आपली काम करण्याची क्षमताही वाढते.

काही नवीन शिका

यासोबतच सकाळी उठल्यावर साधारण २० मिनिटे काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही कुणाचीही मदत घेऊ शकता. मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणनं आहे की, काही नवीन शिकल्याने व्यक्ती मानसिक रुपाने फिट राहतो. तसेच याने आपला आत्मविश्वासही वाढतो.
 

Web Title: 27 minutes morning routine can make you happy and successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.