निर्भया बेटी सुरक्षा कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:36 IST2018-02-17T23:36:00+5:302018-02-17T23:36:40+5:30

येथील गुजराती नॅशनल स्कूल, क्रीडा अधिकारी व गेम्स-स्पोर्र्ट्स अ‍ॅँड करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्तवतीने गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त ....

 Nirbhaya Daughter Security Workshop | निर्भया बेटी सुरक्षा कार्यशाळा

निर्भया बेटी सुरक्षा कार्यशाळा

ठळक मुद्देगुजराती नॅशनल स्कूल, क्रीडा अधिकारी व गेम्स-स्पोर्र्ट्स अ‍ॅँड करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील गुजराती नॅशनल स्कूल, क्रीडा अधिकारी व गेम्स-स्पोर्र्ट्स अ‍ॅँड करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्तवतीने गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेत शनिवारी (दि.१७) निर्भया बेटी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. अर्चना नंदागडे, दीपक शिक्का, विशाल ठाकूर, चेतन मानकर, मुख्याध्यापक वी.एम.चव्हाण व पर्यवेक्षक ए.के.पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी अ‍ॅड. नंदागडे यांनी, समाजातील घटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागरूक करीत सुरक्षा संबंधी कायद्यांची माहिती दिली. दरम्यान, शिक्का व मानकर यांनी विद्यार्थ्यांना आत्म सुरक्षेबाबत माहिती दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मुलगा मुुलगी यांच्यात भेदभाव न करण्याचे आवाहन केले. तसेच मुलींना सुध्दा चांगले शिक्षण देण्याचे द्या, त्यांच्यात भेदभाव करु नका मुली या दोन्ही घरी प्रकाश देत असल्याचे सांगितले. आभार क्रीडा शिक्षक कार्तीक पटेल यांनी मानले.

Web Title:  Nirbhaya Daughter Security Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.