२३ वर्षे लोटूनही गोवारी समाजाचा लढा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:23 PM2017-12-26T23:23:55+5:302017-12-26T23:24:07+5:30
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेद्वारे विधान भवन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात १२४ गोवारी समाजबांधव शहीद झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बुजरुक : २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेद्वारे विधान भवन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात १२४ गोवारी समाजबांधव शहीद झाले. या घटनेला २३ वर्ष पूर्ण झाली. मात्र आजही गोवारी समाजाला न्याय मिळाला नाही. २३ वर्षात केवळ गोवारी समाजाचा लोकप्रतिनिधींनी मतदानापुरताच उपयोग करुन दिशाभूल केल्याची टीका गोवारी समाज संघटनेच्या समन्वयक समितीचे अध्यक्ष शालिकराम नेवारे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केली.
आदिवासी गोवारी समाज संघटना इंदोरा बुज.च्यावतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रमुख म्हणून शालिकराम नेवारे, अॅड. मंगेश नेवारे, डॉ. गुरुदास नेवारे, घनश्याम सोनेवाने, सरपंच प्रभा अंबुले, आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मुरलीदास गोंडाणे, हेमराज अंबुले, माजी सरपंच राजेश रहांगडाले, वंदना मेश्राम, रविकांता ठाकरे, अरुणा वासनिक, पोलीस पाटील हितेश सोनेवाने, राधेश्याम नेवारे, रमेश कृपाले, बुद्धम् राऊत, इसन आंबेडारे, कवडू अंबुले, तोरणलाल सोनेवाने, देबीलाल अंबुले उपस्थित होते. नेवारे यांनी गोवारी समाजांनी आपआपसातील मतभेद विसरुन एका झेंड्याखाली येणार नाही तोपर्यंत १२४ आदिवासी गोवारी समाज शहीद बांधवांना खरी श्रद्धांजली ठरणार नाही. गोवारी समाजामधीेल जाती गोंड व गोवारी यांच्यामधील फरक तसेच कचारगढ येथील आदिवासीचे देवस्थान यावर मार्गदर्शन केले.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम शहीद आदिवासी गोवारी बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून घनश्याम सोनेवाने यांनी संघटनेचे कार्य सांगितले. नेवारे यांनी समाजाला संघटीत होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. तर अॅड. मंगेश नेवारे यांनी २३ वर्षात झालेल्या राजकीय पक्षाकडून समाजाची उपेक्षे बाबत मार्गदर्शन करुन संपूर्ण महाराष्टÑातील आदिवासी गोवारी समाज बांधवांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन टेकचंद चौधरी यांनी केले तर आभार खिलाश कृपाले यांनी मानले.
यशस्वितेसाठी इसन आंबेडारे, करोडपती राऊत, राजू आंबेडारे, मारोती आंबेडारे, रमेश कृपाले, बुद्धल राऊत, पन्नालाल कवरे, सुखदास सोनेवाने, हौशीलाल शहारे, वसंत चौधरी, रामचंद चौधरी, दिलीप आंबेडारे, रवींंद्र शहारे, सहेषराम चौधरी, छाया राऊत, लक्ष्मी कवरे, भूमेश्वरी राऊत, कपील चौधरी, मिलींद चौधरी यांनी सहकार्य केले.