धावत्या स्कूल बसच्या चालकाला हॉर्ट अटॅक, चार वाहनांना दिली धडक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 05:34 PM2018-01-25T17:34:54+5:302018-01-25T17:35:07+5:30

धावत्या स्कूल बसच्या चालकाला हद्यविकाराचा झटका आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ऑटोसह तीन दुचाकीना धडक दिली

Drivers gets heart attack while driving school bus in Gondia | धावत्या स्कूल बसच्या चालकाला हॉर्ट अटॅक, चार वाहनांना दिली धडक 

धावत्या स्कूल बसच्या चालकाला हॉर्ट अटॅक, चार वाहनांना दिली धडक 

Next

गोंदिया : धावत्या स्कूल बसच्या चालकाला हद्यविकाराचा झटका आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ऑटोसह तीन दुचाकीना धडक दिली. ही घटना गुरूवारी (दि.२५) रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाणाºया मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नसून बसमधील विद्यार्थी देखील थोडक्यात बचावले. 

वल्लभ जयस्वाल (५८) असे स्कूल बस चालकाचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांना चालकाला त्वरीत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधीेल सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले. प्राप्त माहितीनुसार हिवरा येथील पोदार इंटरनॅश्नल स्कूलची बस क्रमांक एम. एच. ३५, के- ३७२६ ही बस गुरूवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यासाठी गणेशनगरकडे जात होती. या बसमध्ये एकूण ३० विद्यार्थी होते. यापैकी २४ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर उर्वरित सहा विद्यार्थ्याना सोडण्यासाठी ही बस गणेशनगर जात होती. दरम्यान या स्कूल बसच्या चालकाने जयस्तंभ चौकातून गणेशनगरकडे जाण्यासाठी वळण घेत असताना  बस चालक वल्लभ जयस्वाल यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे बसवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आॅटोला धडक दिली. त्यानंतर बस नियंत्रीत करण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगत असलेल्या एक पानठेला आणि तीन दुचाकी वाहनाना धडक दिली. यात धडकेत दुचाकीचे नुकसान झाले तर एक मोटार सायकल या स्कूल बसच्या चाकात अडकल्याने ती काही अंतरावर फरफट गेली. हीच दुचाकी बसच्या सामोरील चाकात फसल्याने बस थांबली. दरम्यान या मार्गावर एलएआयसी आफीस, बँका आणि रुग्णालय असल्याने या मार्गावर सतत नागरिकांची वर्दळ असते. गुरूवारी दुपारी जयस्तंभ चौक ते गणेशनगर मार्गवरील बसचा हा थरार अनेकांनी अनुभवला. तसेच सुदैवाने थोडक्यात बचावलो अशीच प्रतिक्रीया दिली. दरम्यान एलआयसी आॅफीस आणि पेट्रोलजवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी  घटनास्थळाकडे धाव घेत विद्यार्थ्यांना स्कूलमधून बाहेर काढले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. बस चालकाला हद्यविकाराचा झटका आल्यानेच हा अपघात घडल्याचे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान या घटनेचीे नोंद शहर पोलिसांनी केली आहे.  

अर्धा तास उशीराने पोहचले पोलीस 
जयस्तंभ चौकापासून काहीच अंतरावर स्कूल बसचा अपघात झाला. चौकातील व आजुबाजुला उभ्या असलेल्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचाव कार्य सुरू केले. मात्र पोलीस ही घटना घडल्यानंतर तब्बल अर्धातास उशीराने पोहचले. विशेष म्हणजे सतत वर्दळ असलेल्या जयस्तंभ चौकात सुध्दा वाहतुक नियंत्रक पोलीस शिपाई उपस्थित नव्हते.त्यामुळे उपस्थित नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केला. 

Web Title: Drivers gets heart attack while driving school bus in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा