जबलपूर अपघातातील मृतकांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण
By Admin | Updated: May 14, 2017 00:19 IST2017-05-14T00:19:16+5:302017-05-14T00:19:16+5:30
मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी/कोहळी व सिंदीपार...

जबलपूर अपघातातील मृतकांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी/कोहळी व सिंदीपार येथील ११ मजुरांचा जबलपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जमुनिया जवळील नाल्यावर त्यांना घेवून जाणाऱ्या वाहनाला १० मे च्या पहाटे अपघात झाला. यात ११ जणांचा मृत्यू झाला.
त्या मृतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी भेट देवून त्यांचे सांत्वन केले तसेच ग्रामपंचायत कार्यालय त्या प्रत्येक कुटुंबियांनो प्रत्येकी १ लाख रु पये व जखमींना प्रत्येकी २५ हजार रु पये धनादेश वाटप केले.
यावेळी मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या वतीने देखील मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ लाख रूपये व जखमींना प्रत्येकी २५ हजार रूपये धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी बालाघाटच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रेखा गौरीशंकर बिसेन, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, भाजपा तालुकाध्यक्ष विजय बिसेन, डॉ.भुमेश्वर पटले, गोंदिया न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक भरत क्षत्रीय, ठाकुर, पळसगावच्या सरपंच मंजूळा पराते, बोथलीच्या सरपंच गीता चव्हाण, घाटबोरीच्या सरपंच सुकेशिनी नागदेवे, सिंदीपारच्या सरपंच जसवंत टेकाम, पळसगावचे उपसरपंच मुकेश सिंघल, तहसिलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार केशव वाभळे उपस्थित होते. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असून यापुढे सहकार्याची भूमिका राहणार आहे.