उपराष्ट्रपतींकडून गोव्यात समुद्र दर्शन व राजभवन परिसरात फेरफटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 12:11 PM2018-09-28T12:11:26+5:302018-09-28T12:14:53+5:30

गोवा भेटीवर आलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोव्यात मांडवी-जुवारी नद्या व समुद्राचे दर्शन घेतले.

Vice President M Venkaiah Naidu is on Goa Tour, Visits to beaches | उपराष्ट्रपतींकडून गोव्यात समुद्र दर्शन व राजभवन परिसरात फेरफटका

उपराष्ट्रपतींकडून गोव्यात समुद्र दर्शन व राजभवन परिसरात फेरफटका

Next

- सदगुरू पाटील

पणजी : गोवा भेटीवर आलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोव्यात मांडवी-जुवारी नद्या व समुद्राचे दर्शन घेतले. दोनापावल येथील काबो राजनिवासाच्या परिसरात फेरफटका मारल्यानंतर तिथूनच नायडू यांनी विहंगम समुद्राचे दर्शन घेण्याचा नेत्रसुखद अनुभव घेतला. नायडू हे पूर्वी गोव्यात भाजपाच्या कामासाठी अनेकदा येत असे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तसेच उपराष्ट्रपतीपदी पोहोचल्यानंतरही ते गोव्यात आले. मात्र यावेळच्या त्यांच्या गोवा भेटीवेळी त्यांना राजभवनव परिसरात मनसोक्त फेरफटका मारता आला. तसेच एकाबाजूने शांत शीतल मांडवी नदी व दुस-याबाजूने काहीशी खवळणारी जुवारी नदीही पाहायला मिळाली. मांडवी व जुवारी नदीचा संगम राजभवनच्या परिसरातून पाहता येतो. उपराष्ट्रपतींनी अंगरक्षकांच्या गराड्यातच शुक्रवारी सकाळी राजभवनच्या जंगलसदृश्य भागात व बागेत फेरफटका मारला. 

नायडू हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एनआयटी) ह्या संस्थेच्या पदवीदान सोहळ्य़ाला उपस्थित राहण्यासाठी गोव्यात आले आहेत. त्यांचा गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी राजभवनवर मुक्काम होता.  हॅड अ प्लीजंट मॉर्निग वॉक, अशी टीप्पणी स्वत: उपराष्ट्रपतींनी ट्विटरवरही केली आहे. शेकडो वर्षापूर्वी समुद्रकिनारी बांधलेल्या गोवा राजभवन परिसरात खूप सुंदर अशी वनराई व मोठा बगीचा आहे. उपराष्ट्रपतींना तो आवडला. तेथील वातावरण त्यांना भावले.

हिंदी साहित्यिक असलेल्या बिहारमधील श्रीमती मृदुला सिन्हा ह्या सध्या गोव्याच्या राज्यपालपदी आहेत. त्यांचे पती रामकृपाल सिन्हा यांच्याशी नायडू यांनी मनसोक्त गप्पांचाही आनंद घेतला. रामकृष्ण गोपाळ हे ज्या काळात वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तसेच ते ज्या काळी भाजपचे सचिव या नात्याने काम करत होते, त्या काळातील आठवणींना गप्पांवेळी नायडू यांनी उजाळा दिला. आम्ही भाजपमधील आमच्या सक्रियतेच्या काळातील आठवणींना उजाळा दिल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.

Web Title: Vice President M Venkaiah Naidu is on Goa Tour, Visits to beaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.