‘निवडणूक कामाचा वेळ निश्चित करा’, गोवा सरकारी कर्मचा-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 08:59 PM2017-10-21T20:59:58+5:302017-10-21T21:00:25+5:30

निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या सरकारी कर्मचा-यांची कामाची वेळ काय ती अधिकृतरित्या निश्चित करण्यात यावी अशी मागणी गोवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे.

'Set the time for election work', the demands of Goa government employees | ‘निवडणूक कामाचा वेळ निश्चित करा’, गोवा सरकारी कर्मचा-यांची मागणी

‘निवडणूक कामाचा वेळ निश्चित करा’, गोवा सरकारी कर्मचा-यांची मागणी

Next

पणजी: निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या सरकारी कर्मचा-यांची कामाची वेळ काय ती अधिकृतरित्या निश्चित करण्यात यावी अशी मागणी गोवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे. या कर्मचा-यांना एकाचवेळी त्यांचे अधिकारी, निवडणूक आयोग आणि लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ आणली जात असल्यामुळे त्यांची ससेहोलपट होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 

विविध खात्यातील कर्मचा-यांना विविध ठिकाणी बूथलेवल अधिकारी म्हणून आणि इतर स्वरूपाची निवडणूक आयोगाच्या कामांची जबाबदारी दिलेली असते. ही जबाबदारी पार पाडताना त्या कर्मचा-यांवर कडक आणि जाचक बंधने टाकली जात आहेत. कार्यालयाच्या वेळेला आयोगाची कामे करून ये असे खात्याचे अधिकारी सांगतात तर आयोगाचे अधिकारी जेव्हा बोलावतात तेव्हा जावेच लागते. तसेच मतदारांकडे जाण्याचे किंवा त्यांना संपर्क करण्याचे काम हे कार्यालयीनवेळीनंतर म्हणजेच सहानंतर केले तरीही लोकांना ती वेळ गैरसोयीची वाटते. त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे या कर्मचाºयांनाच द्यावी लागतात. त्यामुळे अशा कर्मचाºयांनी निवडणूक आयोगाचे काम हे नेमक्या कोणत्या वेळेत करावे हे सरकारनेच निश्चित करावे. जेणेकरून या कर्मचाºयांची ससेहोलपट होणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी सांगितले. 

पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात अशा कर्मचा-यांच्या झालेल्या बैठकीत अनेक कर्मचा-यांनी आपल्या व्यथा संघटनेकडे व्यक्त केल्या.  रात्रीच्यावेळीही मतदारांच्या घरी जावे लागते किंवा फोन करावा लागतो त्यावेळी मदारांच्या मूडाचा काही भरवसा नसतो. त्यातही कुत्र्यांची भीती असते अशा अनंत अडचणी कथन केल्या. तसेच त्यांना या कामासाठी देण्यात येणारे १४ रुपये प्रतिदीन मानधन हा थट्टेचा विषय ठरत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. 

या प्रकरणात संघटनेची शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेऊन कर्मचाºयांच्या समस्या त्यांना कथन करतील. तसेच आयोगाला निवेदनही देईल. शिवाय सरकारलाही निवेदन सादर केले जाईल असे नाझारेथ यांनी सांगितले.

Web Title: 'Set the time for election work', the demands of Goa government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.