गोव्यात बेकायदा बीफची विक्री सुरूच, कर्नाटकातून आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 07:36 PM2018-01-01T19:36:21+5:302018-01-01T19:36:28+5:30

गेल्या महिन्यात नाताळाच्या दिवशी पणजीत तेराशे किलो बेकायदेशीर बीफ पकडले गेले होते. त्यानंतर आता पंधरा दिवसांच्या आत दुस:या घटनेत वेर्णा येथे बेकायदा बीफ सापडल्याने राज्यात

Sale of illegal beef in Goa, import from Karnataka | गोव्यात बेकायदा बीफची विक्री सुरूच, कर्नाटकातून आयात

गोव्यात बेकायदा बीफची विक्री सुरूच, कर्नाटकातून आयात

Next

पणजी : गेल्या महिन्यात नाताळाच्या दिवशी पणजीत तेराशे किलो बेकायदेशीर बीफ पकडले गेले होते. त्यानंतर आता पंधरा दिवसांच्या आत दुस:या घटनेत वेर्णा येथे बेकायदा बीफ सापडल्याने राज्यात कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात बेकायदा बीफ गोव्यात दाखल होत असल्याचे समोर आले आहे. 

गेल्या आठवडय़ात 25 डिसेंबर रोजी बेळगावहून बेकायदेशीररित्या गोव्यात बोलेरो गाडीतून आणले जाणारे 13क्क् किलो बीफ पकडले गेले. या गाडीला अपघात झाल्याने कर्नाटकातून बेकायदा बीफ गोव्यात विक्रीस येत असल्याची घटना पुढे आली. हॉनोररी अॅनिमल वेल्फेअर मंडळाच्या अधिका:यांनी या वाहनचालकाकडे बीफ वाहतुकीची कागदपत्रे आणि कत्तलखान्यातून दिलेले प्रमाणपत्र मागितल्यानंतर त्यांना ती देण्यात आली नाहीत. सुमारे बारा लाख रुपयांचे हे बीफ असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर ज्या डॉक्टरचे प्रमाणपत्र वापरले गेले होते, तो पशु संवर्धन खात्याचा अधिकृत डॉक्टर नव्हता. यावरून मंडळाच्या अधिकारी अंजली आनंद यांनी गोव्यातील या बेकायदा बीफ विक्री विरोधात पोलिस स्थानकात तक्रारही दाखल केली होती. या घटनेनंतर राजधानी पणजीतील बीफ विक्रीची दुकाने पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. शनिवारी ती दुकाने खुली करण्यात आली. 

रविवारी 31 डिसेंबर असल्याने मांस विक्री मोठय़ा प्रमाणात होणार, हे लक्षात घेऊन वेर्णा मार्केटमध्ये बीफ विक्रीस आणले होते. पशु संवर्धन मंडळाच्या अधिका:यांनी सकाळी साडेआठ वाजता पोलिसांसमवेत बीफ विक्री करणा:या दुकानावर छापा टाकला. जी व्यक्ती बीफ विक्री करीत होती, त्या तन्वीर बेपारी आणि बाबूलाल बेपारी यांच्याकडे मंडळाने बीफ विक्रीची कागदपत्रे मागितली. परुंत हे विक्रेते कोणतीही कागदपत्रे देऊ न शकल्याने पोलिसांनी सुरे, कापणी यंत्र आणि  इतर साहित्य, तसेच ते बीफही जप्त केले. त्याचबरोबर त्या विक्रेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन घटना पाहिल्यानंतर कर्नाटकात चालविण्यात येणा:या बेकायदा कत्तलखान्यातून विक्रीसाठी हे बीफ गोव्यात आणले जात आहे. याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष देणो अपेक्षित असून, गोव्यात बीफ आणणा:या वाहनांची तपासणी नाक्यावरच कागदपत्रंची तपासणी केली जाणो अपेक्षित आहे, मात्र तसे होत नसल्याने हे बीफ बाजारात विक्रीस दाखल होत असल्याने ही चिंतेची बाब आहे. 

दरम्यान, कर्नाटकात अनेक बेकायदा कत्तलखाने चालतात. राज्यात येणा:या बीफचा दर्जा आणि त्याची न होणारी तपासणी पाहता ते लोकांना हानीकारक असल्याने याविषयी सरकारने पावले उचलावीत, याकरिता आम्ही लवकरच मुख्यमंत्री मनोहर र्पीकर आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणो यांना भेटणार आहोत, असे ‘हॉनोररी’च्या अधिकारी आनंद यांनी सांगितले. 

बीफबद्दल सावधगिरी आवश्यक!

बेकायदा चालविण्यात येणा:या कत्तलखान्यात ज्या गाईची कत्तल केली जाते, त्या गाईची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. त्यामुळे त्या गाईला कोणता आजार आहे समजून येत नाही. काहीवेळा प्राण्यांना कॅन्सरसारखेही आजार असात, त्यामुळे जर अशा प्राण्याचे मांस मनुष्याने खाल्ल्यास त्यासही आजार संभावतो. त्यामुळे अधिकृतपणो विक्री होणा:या ठिकाणावरूनच बीफ खरेदी करावे. बीफ खरेदी करताना नागरिकांनी खबरदारी घेणो आवश्यक आहे, असे पशु संवर्धन क्षेत्रत काम करणा:या हॉनोररी अॅनिमल वेल्फेअर मंडळाच्या अधिकारी आनंद यांनी सांगितले.  

Web Title: Sale of illegal beef in Goa, import from Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.