मडगाव रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:45 PM2017-11-08T17:45:59+5:302017-11-08T17:46:28+5:30

तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आल्याचा संशय असून तपासासाठी कोकण रेल्वेचे पोलीस पथक गेला आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत.

In Mumbai, for the search of a kidnapped kidnapped girl from Margao railway station | मडगाव रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईत

मडगाव रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईत

Next

मडगाव : गेल्या आठवड्यात मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आल्याचा संशय असून तपासासाठी कोकण रेल्वेचे पोलीस पथक गेला आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस त्या मुलीच्या शोधात आहेत. मात्र अजूनही त्या मुलीचा शोध लागू शकला नाही.

मागच्या आठवड्यात या बालिकेचे मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरून अपहरण करण्यात आले होते. तिच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. त्या बालिकेचे अपहरण करताना संशयिताची छबी स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमे-यात टिपली होती. पोलिसांनी ती छायाचित्रे राज्यातील पोलीस ठाण्यात पाठवून दिली आहे. संशयित राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय असल्याने तीन पोलीस पथक नेमून या बालिकेचा शोध घेतला जात आहे.

आपली मुलगी बेपत्ता झाल्यानंतर त्या बालिकेच्या पालकांनी यासंबधी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंसंच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अंर्तगत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. कर्नाटकातील हुबळी येथील हे कुटुंबिय तीन दिवस कोकण रेल्वे स्थानकावर आश्रय घेउन होते. आपल्या मुलांसमवेत ते प्लॅटफॉमवर झोपले असता, एका संशयिताने त्या बालिकेला पळवून नेले होते.

Web Title: In Mumbai, for the search of a kidnapped kidnapped girl from Margao railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.