शिवोली सांजावमध्ये पर्यावरण रक्षण, प्रेम, एकता व सलोखा राखण्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 10:43 PM2018-06-24T22:43:52+5:302018-06-24T22:44:12+5:30

सर्वानी प्रेम,एकता व सलोखा राखण्याचा  संदेश शिवोली येथील सांजाव उत्साहात देण्यात आला.

Message for maintaining environment, protection, solidarity and reconciliation in Shivholi banyan | शिवोली सांजावमध्ये पर्यावरण रक्षण, प्रेम, एकता व सलोखा राखण्याचा संदेश

शिवोली सांजावमध्ये पर्यावरण रक्षण, प्रेम, एकता व सलोखा राखण्याचा संदेश

Next

शिवोली - दिवसेंदिवस पर्याणरणाचा -हास होत आहे.याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.प्रत्येकाने योगदान देणे अत्त्यंत आवश्यक झाले आहे.  कचरा मुक्तीचे ध्येय बाळगत गोवा कचरामुक्त करण्याची गरज आहे. सर्वानी प्रेम,एकता व सलोखा राखण्याचा  संदेश शिवोली येथील सांजाव उत्साहात देण्यात आला.

  येथील सेंट एन्थनी चर्चजवळ पारंपारीक सांजाव बोट महोत्सव साजरा करण्यात आला.शिवोली पारंपारिक सांजाव बोट फेस्टिवल  संस्कृतीक समिती आणि कला आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळ विविध गटांकडुन होड्या सजवुन आणल्या होत्या.एकूण ९ बोटींनी सहभाग घेतला. विविध करमणुकीचे सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.या कार्यक्र मास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

दरम्यान ,शिवोली व आजुबाजुच्या परिसरात सकाळपासूनच युवकांमद्धे उत्सवाचा आनंद दिसून येत होता.त्यातच रविवारची सुट्टी असलयाने अनेकांनी सुट्टीचा आनंद लुटला. ओशेल,खैराट,वागाळी,कामुर्ली,राय,दांडा,गुडे,मार्ना,मधले भाट,सडये वगैरे परिसरात अनेक युवकांनी विहिरीत उड्या मारून उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला.  

Web Title: Message for maintaining environment, protection, solidarity and reconciliation in Shivholi banyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.