गोव्यात येणा-या रशियन पर्यटकांच्या संख्येत वाढ, तीन महिन्यात तब्बल 61,153 पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 04:14 PM2017-12-28T16:14:31+5:302017-12-28T16:14:48+5:30

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पर्यटन व्यावसायिकांकडून होत असला तरी यंदाचे रशियन पर्यटकांचे गोव्यात येण्याचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे.

Increase in the number of Russian tourists coming to Goa, 61,153 tourists in three months | गोव्यात येणा-या रशियन पर्यटकांच्या संख्येत वाढ, तीन महिन्यात तब्बल 61,153 पर्यटक

गोव्यात येणा-या रशियन पर्यटकांच्या संख्येत वाढ, तीन महिन्यात तब्बल 61,153 पर्यटक

googlenewsNext

मडगाव : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पर्यटन व्यावसायिकांकडून होत असला तरी यंदाचे रशियन पर्यटकांचे गोव्यात येण्याचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन महिन्यात तब्बल 125 चार्टर्ड फ्लाईट्समधून 32,938 रशियन आले होते. यंदा या दोन महिन्यात गोव्यात येणा-या रशियन चार्टर्ड फ्लाईट्सची संख्या 173 वर पोचली असून या दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण 47,743 रशियन गोव्यात आले आहेत.
गोवा पर्यटन महामंडळाकडून ही अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. यंदा डिसेंबर 1 ते 13 या कालावधीत रशियाहून 51 विमाने गोव्यात आली असून एकूण 13,410 पर्यटक त्यामधून गोव्यात आले आहेत. रशियन पर्यटकांसाठी गोवा हे सर्वात अधिक पसंतीचे स्थळ असून प्रत्येकवर्षी गोव्यात येणा-या विदेशी पर्यटकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त प्रमाण रशियनांचेच असते. त्यामुळे गोव्यातील किनारपट्टीत इंग्लिशप्रमाणे रशियन भाषेचीही चलती असून कित्येक शॉक्समधील बोर्ड आवर्जून रशियन भाषेत लिहिलेले असतात. गोव्यात प्रत्येक किना-यावर यामुळे रशियन भाषा स्थानिकांमध्येही परिचित झालेली आहे.
गोवा पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान एकूण 77,871 विदेशी पर्यटकांचे चार्टर्ड विमानांतून गोव्यात आगमन झाले आहे. त्यापैकी 61,153 पर्यटक रशियातून आले आहेत त्यापाठोपाठ ब्रिटीश पर्यटकांचा नंबर लागतो. ब्रिटनमधून यंदा पहिल्या तीन महिन्यात 12,625 पर्यटक आले आहेत. फिनलँडमधून आलेल्या 11 चार्टर्ड फ्लाईट्समधून 1,921 फिनिश पर्यटक गोव्यात आले आहेत. तर 1,990 पर्यटक कझाकिस्तानमधून गोव्यात आले आहेत. यंदा सर्वात कमी पर्यटक इराणमधून गोव्यात आले असून आतार्पयत तीन  फ्लाईट्समधून 92 पर्यटकांनी या देशातून गोव्यात आगमन केले आहे.

Web Title: Increase in the number of Russian tourists coming to Goa, 61,153 tourists in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा