गोव्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 13:30 IST2018-07-06T13:08:01+5:302018-07-06T13:30:41+5:30

गोव्य़ाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

heavy rain in goa | गोव्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 

गोव्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 

पणजी :  रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतानाच गोव्य़ाला देखील मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाचा फटका हा रस्ते वाहतूकीलाही मोठ्याप्रमाणात बसला असून वाहतूक मंदावली आहे. तसेच गोव्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत. 

कोकणातही अतिवृष्टीमुळे खेड आणि चिपळूणमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह इतर शहरांमध्ये पुढचा आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Web Title: heavy rain in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.